लाइव न्यूज़
 • 06:16 PM

  ठाणे: नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांना बेकायदेशीर सीडीआर प्रकरणी शुक्रवारी अटक. ठाणे न्यायालयाने 23 मार्च पर्यंत सुनावली पोलीस कोठडी.

 • 05:57 PM

  औरंगाबाद : मागणीपेक्षा अधिक औषधी खरेदी केल्या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड निलंबित. लोकमतने केला होता या प्रकरणाचा पर्दाफाश.

 • 05:52 PM

  दिल्लीः आंध्र प्रदेशमधील भाजप नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू. राम माधव सुद्धा बैठकीला उपस्थित.

 • 04:56 PM

  रत्नागिरी - नाणार प्रकल्प होणार नाही. जबरदस्ती झाली तर शिवसेना लोकांसोबत आहे - चिपळूण तालुक्यातील घोणसरे येथील निर्धार मेळाव्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही.

 • 04:38 PM

  पुणे एटीएसने अटक केलेल्या तिघा बांगलादेशी आरोपीना २९ मार्चपर्यंत कोठडी.

 • 04:14 PM

  अकोला : आकोट तालुक्यात कृषी अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना १ लाख ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक.

 • 04:04 PM

  ठाणे- सोफा, पाळणा बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू. भिवंडीतील कोनगावातील घटना.

 • 04:01 PM

  पीएनबी घोटाळा- गोकुलनाथ शेट्टी व विपूल छितालीआसह अटकेत असलेल्या 11 जणांना 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी. सीबीआयच्या विशेष पथकाचा निर्णय.

 • 03:48 PM

  पश्चिम बंगाल : जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यावर शाईफेक, पोलीस करताहेत तपास.

 • 03:42 PM

  नाशिक : शिवसेना महानगरप्रमुखपदी सचिन मराठे व महेश बडवे यांची निवड.

 • 03:37 PM

  यवतमाळ : बसस्थानक चौकातील सिग्नलवर ट्रकने स्कुटीला चिरडले. दाम्पत्याचा मृत्यू, दोन वर्षाची नात सुदैवाने बचावली.

 • 03:23 PM

  नवी दिल्ली : काँग्रेस अन्यायाविरोधात सोनिया गांधी आवाज उठवते - सोनिया गांधी

 • 03:18 PM

  नागपुरात बाईकवरुन जाणा-या तरुणीवर चाकूहल्ला, जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू. आरोपी फरार, हत्येचं कारण अस्पष्ट.

 • 03:13 PM

  अहमदनगरमधील खंडाळ्यातील नीरव मोदीच्या जमिनीवर शेतकऱ्यांचा कब्जा, उद्यापासून शेत नांगरुन कसण्याचा निर्णय

 • 02:28 PM

  नगर : देशाला गंडवणा-या नीरव मोदीला दणका,खंडाळा गावातील नीरव मोदीच्या जमिनीवर ताबा. कर्जत तालुक्यातील जमिनीवर शेतक-यांचा ताबा.

All post in लाइव न्यूज़