लाइव न्यूज़
 • 01:25 PM

  ठाणे : दिवा परिसरात मागील दोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असून ही कामं नियमानुसार होत नसल्याने भाजपाचं आंदोलन, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खासगी कार्यालयासमोर श्राद्ध घालून नोंदवला निषेध .

 • 01:13 PM

  कझाकिस्तानमध्ये बस अपघातात 52 जणांचा मृत्यू

 • 01:12 PM

  नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांड :जातीयवादी व्यवस्था आणि मनात त्यामुळे राग व द्वेष धरुन आरोपींनी हत्याकांडाचा कट रचला : अॅड. उज्ज्वल निकम

 • 01:04 PM

  नवी दिल्ली- दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये एनआयनं टाकलं हाफिज सईदचं नाव

 • 01:02 PM

  नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील केंद्रीय नवोदय विद्यालयात 10वीत शिकणा-या विद्यार्थिनीची आत्महत्या, जागृती पावराच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलीस करताहेत तपास.

 • 12:57 PM

  नाशिक : अहमदनगरमधील सोनई हत्याकांड मानवतेला काळिमा फासणारे - अॅड.उज्ज्वल निकम

 • 12:55 PM

  2013 मधील सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरण : खटल्याची सुनावणी पूर्ण, 6 दोषींच्या शिक्षेवर 20 जानेवारीला सुनावणी होणार. आरोपींना मृत्यूदंड द्यावा - विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 • 12:51 PM

  मालेगाव (नाशिक) बाजार समिती सभापती निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त. भाजपा, शिवसेना समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित.

 • 12:47 PM

  मुंबई : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा मुंबई दौरा, नरीमन हाऊसच्या गल्लीतील सर्व दुकानांची झाडाझडती सुरू.

 • 12:34 PM

  मुंबई : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आगमनापूर्वी इस्त्रायली पोलिसांकडून दुकानांची तपासणी.

 • 12:33 PM

  नाशिक : नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत गोंधळ, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात पथदीप बंद असल्याने शिवप्रेमींची बैठकीत घुसून घोषणाबाजी.

 • 12:24 PM

  नवी दिल्ली: नागालँड, त्रिपुरा व मेघालय राज्यांत विधानसभेच्या ६० जागा; तिन्ही राज्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर होणार - निवडणूक आयुक्त

 • 12:01 PM

  जळगाव : अमळनेर येथील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा भाजपात प्रवेश.

 • 11:54 AM

  नवी दिल्ली : 'पद्मावत' सिनेमा सर्व राज्यांत होणार प्रदर्शित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय.

 • 11:39 AM

  5 हजार किलोमीटर रेंज असलेल्या आंतरखंडीय अग्नि-5 क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी.

All post in लाइव न्यूज़