पदवीधरमध्ये यंदा ‘मास्टर’ कोण , शिवसेना, भाजपात उमेदवारीसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:32 AM2018-05-14T05:32:41+5:302018-05-14T05:32:41+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक जाहीर होताच शिवसेना, भाजपामधील इच्छुकांतील उमेदवारीची चुरस समोर येत असली

This year, the 'Master' who graduated in the graduation, Shivsena and BJP, will contest for candidature | पदवीधरमध्ये यंदा ‘मास्टर’ कोण , शिवसेना, भाजपात उमेदवारीसाठी चुरस

पदवीधरमध्ये यंदा ‘मास्टर’ कोण , शिवसेना, भाजपात उमेदवारीसाठी चुरस

Next

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक जाहीर होताच शिवसेना, भाजपामधील इच्छुकांतील उमेदवारीची चुरस समोर येत असली, तरी सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांना आपल्या पक्षात ओढून घेण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. डावखरे किंवा त्यांचे निकटवर्ती याबाबत कोणतेही संकेत देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असतानाच येत्या आठ दिवसांत या निवडणुकीच्या घडामोडींना वेग येईल.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे हयात असताना त्यांनी शिवसेना, काँग्रेसमधील आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा वापर करून मुलगा निरंजन यांचा राजकीय प्रवेश सोपा केला होता.
मात्र निवडून आल्यावर सुरूवातीच्या टप्प्यात शहरी भाग वगळता ते मतदारसंघावर छाप पाडण्यात कमी पडले. गेल्या दीड-दोन वर्षांत ती कसर भरून काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. जेव्हा ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून वसंत डावखरे यांनी पुन्हा उमेदवारी दाखल केली होती, तेव्हा शिवसेनेने त्यांना पाठिंबा न देता रवींद्र फाटक यांना निवडून आणले. त्याचवेळी डावखरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निरंजन यांच्या फेरनिवडीसाठी शब्द टाकल्याची चर्चा होती. जेव्हा डावखरे यांचे निधन झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांनी मुंबईत रूग्णालयात जाऊन निरंजन यांचे सांत्वन केले. नंतर ठाण्यात जेव्हा डावखरे यांची शोकसभा झाली, तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांची तेथील उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे निरंजन शिवसेनेतर्फे ही निवडणूक लढवतील, अशी चर्चाही सुरू झाली. शिवसेना नेत्यांनी त्यांच्याशी जसा संपर्क ठेवला, तेवढा भाजपाने ठेवलेला नाही,े हेही सूचक मानले जाते.
शिवसेनेने आजवर ही निवडणूक लढवलेली नाही. डॉ. अशोक मोडक, संजय केळकर यांनी हा मतदारसंघ गाजवला.
पण राष्ट्रवादीने तो गेल्यावेळी भाजपाकडून खेचून घेतला, तेव्हा शिवसेनेने हे डाव खरे केल्याची चर्चा होती. निरंजन हे सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी मोजका अपवाद वगळता गेल्या काही दिवसांत ते त्या पक्षाच्या व्यासपीठावर फारसे दिसलेले नाहीत. पदवीधर, शिक्षक, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी यांचे प्रश्न मांडत ते स्वतंत्रपणे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोकणात त्यांनी नुकताच केलेला दौराही हेच स्वतंत्र अस्तित्त्व दाखवत होता. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल ही राष्ट्रवादीपेक्षा अन्य पक्षातून होईल, याचे स्पष्ट संकेत त्यांनीच दिले आहेत.
भाजपाला टक्कर देत यावेळी शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांची चर्चाही झाली. त्यामुळे पालघरचा प्रचार शेवटच्या टप्प्यात येताच २२ मे पर्यंत कोकण पदवीधरचे राजकीय चित्रही स्पष्ट होईल. तेथेही शिवसेना-भाजपातच थेट लढत होईल.

भाजपातर्फे लेले की अन्य कोणी?
भिवंडी-पालघरच्या राजकारणावर वर्चस्वासाठी प्रयत्न करणारे खासदार कपिल पाटील यांनी या निवडणुकीसाठी आपला मुलगा डॉ. सिद्धेश यांचे नाव गेल्या वर्षीच चर्चेत आणल्याने परिवारात नाराजी होती. भिवंडी महापालिका, ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीवर ते फारसा प्रभाव पाडू शकले नव्हते. पालघरमधील वनगा कुटुंबाची समीकरणेही त्यांना सुरूवातीपासून जुळवता न आल्याची पक्षात चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा आग्रह कितपत मान्य होईल, याबाबत शंका आहे. विनय नातू यांनीही आपण स्पर्धेत असल्याचे जाहीर केले असले, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांपलिकडे त्यांचा प्रभाव नाही. भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, पक्षाचे आक्रमक-अभ्यासू नगरसेवक मिलिंद पाटणकर, डॉ. राजेश मढावी हेही चर्चेत आहेत. पक्षाने मध्यंतरी परिवारातील सुधीर जोगळेकर यांच्या नावाचीही चर्चा केली होती. पण यातीलच एखादे नाव निश्चित होईल की वेगळ््या चेहऱ्याचा विचार होईल, यावर भाजपा नेते बोलण्यास तयार नाहीत. ठाणे जिल्ह्यात भाजपाची ताकद थोडी वाढलेली असली, तरी रायगडमध्ये ठाकूर कुटुंबामुळे पनवेलमध्ये पक्षाचा दबदबा आहे. रायगडचे पालकमंत्रीपद भूषविणारे रवींद्र चव्हाण कोणती ताकद गोळा करतात यावर तेथील चित्र अवलंबून आहे. रत्नागिरीत नातू यांचा प्रभाव मोजक्या तालुक्यांत आहे, तर सिंधुदुर्गात नारायण राणे देतील त्या ताकदीवर विसंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे भाजपाला संघ परिवाराच्या संघटनात्मक ताकदीवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यासाठी संघाला रूचेल, असा उमेदवार द्यावा लागेल.

राणेंची भूमिका निर्णायक
सिंधुदुर्गात भाजपाच्या उमेदवाराला नारायण राणे बळ पुरवू शकतात. दिवंगत वसंत डावखरे यांचा मुलगा म्हणून निरंजन यांना साह्य करण्याची जरी राणेंची भूमिका असली, तरी ते जर शिवसेनेतर्फे रिंगणात उतरले; तर मात्र त्यांना राणेंची थेट मदत मिळण्याची शक्यता नाही.

Web Title: This year, the 'Master' who graduated in the graduation, Shivsena and BJP, will contest for candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.