मोबाईल चोरीसाठी त्रिकुटातील एकाच्या गोळीबारात कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:04 PM2019-02-19T22:04:35+5:302019-02-19T22:07:30+5:30

भिवंडी : शहर आणि ग्रामिण भागात मोठ्या संख्येने अत्याचार,चोरी व हाणामारीचे प्रकार जास्त संख्येने घडू लागले आहेत. शहरालगत सोनाळे ...

Workers injured in firing in Trikuta for mobile theft | मोबाईल चोरीसाठी त्रिकुटातील एकाच्या गोळीबारात कामगार जखमी

मोबाईल चोरीसाठी त्रिकुटातील एकाच्या गोळीबारात कामगार जखमी

Next
ठळक मुद्देचोरांच्या त्रिकुटापैकी एकाने केला गोळीबारकामाक्षाप्रसाद साहू कामगार गोळीबारात जखमीगोळीबारानंतर मोबाईल घेऊन त्रिकुटाचे पलायन

भिवंडी : शहर आणि ग्रामिण भागात मोठ्या संख्येने अत्याचार,चोरी व हाणामारीचे प्रकार जास्त संख्येने घडू लागले आहेत. शहरालगत सोनाळे गावातून घरी परतणाऱ्या कामगारास सोमवार रोजी रात्री एकटे गाठून लुटणाºया त्रिकुटाने त्याच्यावर गोळीबार करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले.
कामाक्षाप्रसाद नारायण साहू(३०) असे सोनाळे गावातील कंपनीत काम करणा-या कामगाराचे नांव असून तो सोमवार रोजी रात्री साडेआठ वाजता कामावरून घरी जात होता. तो एकटा असल्याचे पाहून समोरून दुचाकीवर बसून येणा-या तीन चोरट्यांनी त्यास अडविले. त्याच्याकडून मोबाईल हिसकावू लागल्यानंतर कामाक्षाप्रसाद याने त्यांना प्रतिकार केला असता त्यांच्यात झटापटी झाली. दरम्यान चोरांच्या त्रिकुटापैकी एकाने आपल्या रिव्हाल्वर मधून कामाक्षाप्रसादाच्या दिशेने गोळीबार केला. त्यापेकी एक गोळी कामाक्षाप्रसादच्या पायास लागली. तो जखमी झाल्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल घेऊन तिघे दुचाकीवरून पळून गेले. जखमी कामाक्षाप्रसाद यांस शहरातील खाजगी रूग्णालयांत उपचारासाठी दाखल केले असून या घटनेप्रकरणी तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनाळे या गावात औद्योगीक वसाहत असून येथे परप्रांतातून अलेले कामगार काम करीत आहेत. या कामगारांना रात्रीच्या वेळी एकटे गाठून मारहाण करणे,लूटणे असे प्रकार घडत असतात.त्यामुळे परिसरांतील नागरिकांनी भिती व्यक्त करून पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

Web Title: Workers injured in firing in Trikuta for mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.