व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज पडला १७ लाखांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:25 AM2018-07-22T05:25:37+5:302018-07-22T05:26:06+5:30

८६ लाखांच्या बक्षिसाचे आमिष; वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल

WhatsappSpace Message Has Been 17 Million | व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज पडला १७ लाखांना

व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज पडला १७ लाखांना

Next

ठाणे : ठाण्यातील एका वृद्धाला व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज चांगलाच महागात पडला आहे. त्या मेसेजमधील ८६ लाखांच्या बक्षिसासाठी कृष्णा पाठक (५६) यांना आठ दिवसांत सुमारे १७ लाख रुपये गमवावे लागले आहेत. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप नंबरधारक आणि सनिया शर्मा या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार २ ते ९ जुलैदरम्यान घडल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
पोखरण रोड नंबर-२ येथील स्वस्तिक गार्डन येथे राहणारे पाठक यांना २ जुलै रोजी त्यांच्या मोबाइल फोनवर +४४७४६६११६२२९ या नंबरवरून एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. त्यामध्ये त्यांना ८६ लाखांचे बक्षीस लागल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांना सनिया शर्मा नामक एका महिलेने फोन करून ते बक्षीस मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे दिली. तसेच, तिने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. अशा प्रकारे पाठक यांनी १६ लाख ६० हजार रुपये भरलेही, तरीसुद्धा बक्षिसांची रक्कम मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्या दोघांवर फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: WhatsappSpace Message Has Been 17 Million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.