पश्चिम महाराष्ट्राने केला 23 कोकणरत्नांचा सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:09 PM2019-07-08T16:09:34+5:302019-07-08T16:14:20+5:30

पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने कोकणातील 23 गुणवंतांचा रविवारी  कोकण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Western Maharashtra honored 23 Konkan Ratna | पश्चिम महाराष्ट्राने केला 23 कोकणरत्नांचा सन्मान 

पश्चिम महाराष्ट्राने केला 23 कोकणरत्नांचा सन्मान 

Next

ठाणे -  पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने कोकणातील 23 गुणवंतांचा रविवारी  कोकण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विकसनशील महाराष्ट्राच्या विकासासाठी डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी पाहिलेले स्वप्न हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था पुढे नेत आहे अशा शब्दात संस्थेचा गौरव केला. 

अंध व दिव्यांगांच्या हक्क आणि अधिकारांसाठी कार्यरत असलेल्या  हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने विविध भागातील गुणवंतांचा सत्कार करण्यात येत असतो. याच अनुषंगाने या संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. 

रविवारी दुपारी 3 वाजता सेंट लॉरेन्स हायस्कूल, वागळे इस्टेट येथे आयोजित या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. तसेच  वास्तूशास्त्र तज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव, ठाण्यातील उद्योजक अविनाश जाधव, सुदेेश दळवी, अप्पर सचिव मनोहर बंदपट्टे, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, मेहबूब इनामदार, पोलीस उपनिरीक्षक समीर पवार यांच्यासह राजकीय, प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थिती दर्शविळी. या कार्यक्रमाच्या आयोजनात शमशाद बेगम, कार्यवाहक सपना अविनाश जाधव यांनी  पुढाकार घेतला होता. 

दिवंगत डेनीस डिसोजा यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, शिक्षण, उद्योग,  शिक्षण, दिव्यांग, सिनेमा, वैद्यकीय आदी क्षेत्रातील  भागोजी खरात, महाड मॅन्युफ्रॅक्चरींग असोशिएशन, धनाजी गुरव, सुधीर पवार, विनोदराव मोरे, ताताब्या मुरलीधर शेफाळ, संकटाप्रसाद सिंग, शुभांगी ताजणे, संगीता हळदणकर, सर्वेश घाणेकर, अमीत आधवडे, पाकिजा अत्तार, मानसिंग यादव, अश्विनी शिंपी, अनिल सावंत, सोनाली कालगुडे, चारुशिला पाटील, स्वास्थ फाउंडेशन, मिलींद जगताप, श्रमिका दळवी, पौर्णिमा पवार, माधुरी माने यांचा सत्कार करण्यात आला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच. आर यादव, राजश्री सावंत, अ‍ॅड. संजय जाधव, जयवंत घोरपडे, सायली मिरजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Web Title: Western Maharashtra honored 23 Konkan Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.