विवाहोत्सुकांना दिलासा; विवाह नोंदणी आता आॅनलाईन करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:18 PM2018-07-10T15:18:50+5:302018-07-10T15:30:14+5:30

असा होतो विवाह अधिकारी कार्यालयात विवाह विशेष विवाह कायद्याप्रमाणे विवाह इच्छुक वर आणि वधू सर्व पुराव्यांच्या कागदपत्रानिशी विवाह अधिकारी कार्यालयात येऊन नोटीस देतात. यात वय, रहिवास अशी कागदपत्रे असतात. या नोटीसची  प्रत नोटीस बोर्डवर लावण्यात येते. ३० दिवसांच्या आत नियोजित विवाहाबाबत आक्षेप न आल्यास त्यानंतरच्या ६० दिवसांत वर - वधू साक्षीदारांना घेऊन विवाह अधिकारी यांच्यासमोर हजार राहतात आणि मग त्याचा विवाह लावण्यात येऊन प्रमाणपत्र देण्यात येते.

Wedding solutions; It is mandatory to register marriage registration online now | विवाहोत्सुकांना दिलासा; विवाह नोंदणी आता आॅनलाईन करणे बंधनकारक

विवाहोत्सुकांना दिलासा; विवाह नोंदणी आता आॅनलाईन करणे बंधनकारक

Next
ठळक मुद्दे नोंदणी व मुद्रांक विभागाचे महत्वाचे पाऊलविवाह नोंदणी घरबसल्या आॅनलाईन करण्याचे बंधनकारकघरी बसून आॅनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.www.igrmaharashtra.gov.in

ठाणे : नोंदणी व मुद्रांक विभागाने विवाह नोंदणी घरबसल्या आॅनलाईन करण्याचे बंधनकारक केले आहे. यामुळे आता विवाहोत्सुक मंडळींना विवाहाच्या नोंदणी वगैरे प्रक्रियेसाठी आपला वेळ दवडण्याची गरज नाही. ते घरी बसून आॅनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.
यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार आता १ आॅगस्टपासून विवाहाची नोटीस केवळ आॅनलाईनच स्वीकारण्यात येणार आहे. विशेष विवाह नोंदणीकरीता सध्या वर अ आणि वधू यांना विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस देणे व नंतर विवाह संपन्न करणे अशा दोन कारणांसाठी प्रत्यक्ष जावे लागत असे. यापैकी पहिली म्हणजे नोटीस देण्याची प्रक्रिया १नोव्हेंबर २०१७ पासून आॅनलाईन पूर्ण करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. याची लिंक देखील www.igrmaharashtra.gov.in देण्यात आली आहे. मात्र आता ही प्रक्रिया केवळ आॅनलाईनच करणे या नव्या निर्णयानुसार बंधनकारक राहील, असे कोकण विभाग नोंदणी उप महानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक , अमोल अ. यादव यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका दुय्यम निबंधकास त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आले आहे . मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. या विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रि या देखील संगणकीकृत केली आहे. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर आवश्यक ती माहिती संगणकात भरण्यात पक्षकारांचा वेळ वाया जाऊ नये किंवा चुका होऊ नये म्हणून आपली डाटा एन्ट्री आपणच करण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.

Web Title: Wedding solutions; It is mandatory to register marriage registration online now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.