पाण्याच्या वाढीव बिलांची फेरतपासणी होणार, आयुक्तांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 06:42 PM2018-02-22T18:42:29+5:302018-02-22T18:55:12+5:30

२० फेब्रुवारीला पार पडलेल्या विशेष महासभेत भाजपाचे श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्ना यांनी वाढीव बिलांचा मुद्दा उपस्थित केल्याने आयुुक्त बी. जी. पवार यांनी त्या बिलांची फेरतपासणी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. 

Water bill will be reviewed and Commissioner's assurance will be reviewed | पाण्याच्या वाढीव बिलांची फेरतपासणी होणार, आयुक्तांचे आश्वासन

पाण्याच्या वाढीव बिलांची फेरतपासणी होणार, आयुक्तांचे आश्वासन

Next

- राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेकडुन शहरातील नागरीकांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याची बिले अचानकपणे  ४० ते ५० टक्यांनी वाढल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत २० फेब्रुवारीला पार पडलेल्या विशेष महासभेत भाजपाचे श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्ना यांनी वाढीव बिलांचा मुद्दा उपस्थित केल्याने आयुुक्त बी. जी. पवार यांनी त्या बिलांची फेरतपासणी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. 

पालिकेकडुन एप्रिल २०१८ पासून निवासी वापरासाठी १३ रुपये व व्यावसायिक वापरासाठी ५० रुपये वाढीव दराने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा ठराव २० फ्रब्रुवारीच्याच महाभसेत मंजुर करण्यात आला आहे. त्यापुर्वीच शहरातील बहुतांशी लोकवस्तींना ४० ते ५० टक्के वाढीव दराने पाण्याची बिले धाडण्यात आल्याने नागरीकांत संभ्रम निर्माण झाला होता. त्यांनी ती बिलेच न भरण्याचा पावित्रा घेतला होता. दरम्यान शहराला ७५ एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा मंजुर झाल्याने त्यातील ५० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मिळू लागला आहे. उर्वरीत २५ एमएलडी पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पालिकेला उपलब्ध होणार आहे. या पाणीपुरवठ्यापोटी पालिका नागरीकांकडुन २०१४ पर्यंत प्रती १ हजार लीटर निवासी पाणीपुरवठ्यासाठी ७ रुपये तर व्यावसायिक पाणीपुरवठ्यासाठी २८ रुपये दर वसुल करीत होती. त्यात गेल्या अनेक वर्षांपासुन वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने २०१५ मधीलच स्थायीत दरवाढीचा प्रस्ताव सादर केला. स्थायीने त्याला मान्यता दिल्यानंतर ३० एप्रिल २०१५ रोजीच्या महासभेने निवासी दर १० रुपये व वाणिज्य दर १२ रुपये पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली. गेल्या तीन वर्षांतील हि दरवाढ सुमारे ४० टक्के इतकी ठरणार असतानाच पालिकेला राज्य सरकारने एमआयडीसी कोट्यातून ७५ एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा मंजुर केला. त्यापैकी २०१५ मध्ये २० तर ३० एप्रिल २०१७ पासून ३० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा शहराला उपलब्ध होऊ लागला. यामुळे शहरातील पाण्याची समस्या काही प्रमाणात मार्गी लागली. शहरात अधिकृत नळजोडण्यांची संख्या ३६ हजार ९६४ इतकी असली तरी काही प्रमाणात अनधिकृत नळजोडण्या देखील देण्यात आल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपुर्वी  उजेडात आले होते. पाणी वाढले तरी काही भागांत न पोहोचलेले पाणी पोहाचू लागले व पाणीपुरवठ्यातील अंतर सुमारे ४० तासांहून २५ तासांवर आले. परंतु, पाणी वाढल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने नागरीकांना सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांच्या पाणी वापराचे बिल वाढीव दराने वितरीत केले. सध्या पाण्याची बिले १० रुपये प्रती १ हजार लीटरप्रमाणे वसुल करण्यात येत असतानाही अचानक बिलांची रक्कम कशी काय वाढली, असा संभ्रम नागरीकांत निर्माण झाला. त्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये प्रसिद्ध करताच सिंह यांनी आपल्या प्रभागातील एकाच इमारतीच्या दोन विंगमध्ये सारखेच पाणी येत असताना एका विंगला १६ हजार तर दुसय््राा विंगला ३२ हजार रुपयांचे वाढीव बिल देण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिले. तसेच शहरातील ७५ टक्के पाण्याचे मीटर बंदावस्थेत असल्याची माहिती सभागृहाला दिला. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी गेल्या वर्षी जूलै महिन्यापासुन शहराला वाढीव पाणीपुरवठा सुरु झाल्याने वाढीव बिले देण्यात आल्याचा दावा केला. त्याला सभागृहाने अमान्य केल्याने वाढीव बिलांची फेरतापसणी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. तसेच सतत नादुरुस्त होणाऱ्या जुन्या मीटरऐवजी डिजिटल मीटर बसविण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. 

Web Title: Water bill will be reviewed and Commissioner's assurance will be reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.