सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:24 AM2018-01-24T02:24:04+5:302018-01-24T02:24:20+5:30

सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.

 Watch the social media to keep cyber labs? | सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?

सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?

Next

ठाणे : सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.
‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ या नावाने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, सायबर गुन्ह्यांचे तज्ज्ञ वकील राजस पिंगळे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एस.बी. सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे उपस्थित होते. डॉ. भाजीभाकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अ‍ॅड. पिंगळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची खबरदारी याबाबत विस्तृत माहिती दिली. कुठेही गेलो की, फेसबुकवर ‘चेक इन’ करण्याची नेटकरींना हौस असते. मात्र याद्वारे घरी नसल्याची आपण माहिती जगभराला देतो. चोरांना हे आयतेच निमंत्रण असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. कोणतेही अ‍ॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करताना आपण आपली खासगी माहिती वापरण्याची परवानगी त्रयस्थाला देत असतो. याचा दुरूपयोग होऊ शकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. व्हॉटस्अ‍ॅपचे वेगवेगळे ग्रुप प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये असतात. या ग्रुपमधील सर्वच सदस्यांना आपण ओळखत नसतो. त्यामुळे कोणतीही पोस्ट ग्रुपमध्ये पाठवताना, ती कुणाचीही व्यक्तिगत किंवा जाती-धर्माची बदनामी करणारी तर नाही, याचा दहावेळा विचार करावा. अशा प्रकारची चूक फौजदारी कारवाईसाठी पुरेशी ठरू शकते. वधु-वर सुचक संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही अलीकडच्या वाढले आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यासाठी कोणती माहिती घेतली जावी, याबाबत सुधारित दिशानिर्देश तयार केले जात असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या सर्व शंकांचे डॉ. भाजीभाकरे आणि अ‍ॅड. पिंगळे यांनी निरसन केले.
जागरूकता हाच उत्तम उपाय-
सायबर गुन्ह्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. लोकांच्या अज्ञानाचा आणि गाफिलीचा ते पुरेपूर गैरफायदा घेतात. सुशिक्षित लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही अनेकदा घडतात.
हे प्रकार रोखण्यासाठी सायबर सेलमार्फत प्रयत्न सुरू असले तरी सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी जागरूकता बाळगल्यास हे प्रमाण बºयापैकी कमी होण्यास मदत होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी
यावेळी सांगितले.

Web Title:  Watch the social media to keep cyber labs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.