कल्याण-डोंबिवली महापालिकेचा फ प्रभाग कचरा मुक्त करण्यावर भर देणार - साई शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 05:46 PM2018-04-18T17:46:17+5:302018-04-18T17:46:17+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कच-याच्या समस्येमुळे कलंक लागला होता, तो पुसण्यासाठी फ प्रभागात ती समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी त्या पदाचा पदभार स्विकारला, माजी सभापती खुशबु चौधरी यांनी शेलार यांना कामाची पद्धत समजावून सांगत पदभार दिला.

Ward of Kalyan-Dombivali Municipal Corporation will focus on free of waste - Sai Shelar | कल्याण-डोंबिवली महापालिकेचा फ प्रभाग कचरा मुक्त करण्यावर भर देणार - साई शेलार

फ प्रभागाचा घेतला पदभार

googlenewsNext
ठळक मुद्देफ प्रभागाचा घेतला पदभार भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करणार

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कच-याच्या समस्येमुळे कलंक लागला होता, तो पुसण्यासाठी फ प्रभागात ती समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी त्या पदाचा पदभार स्विकारला, माजी सभापती खुशबु चौधरी यांनी शेलार यांना कामाची पद्धत समजावून सांगत पदभार दिला.
त्यावेळी शेलार यांनी सांगितले की, फ प्रभागातील खंबाळपाडा, त्रिमुर्ती नगरचा काही भाग, तसेच स्टेशन परिसर आदी ठिकाणी कच-याची समस्या भेडसावते. त्या सर्व ठिकाणी ही समस्या निकाली निघण्यासाठी सफाई कामगारांसह अधिका-यांसमवेत कामाचे नियोजन करण्याचा मानस आहे. सगळया ठिकाणी समसमान कर्मचारी आणि त्यांची नित्याची हजेरी, कामाच्या वेळा या तांत्रिक बाबींवर लक्ष देण्याचा मानस आहे. तसेच फ प्रभागातील भटक्या कुत्र्यांची समस्या मार्गी लावण्यासाठीही विशेष लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.
कचरा झाला की तेथे भटके कुत्रे येतात, ते कचरा इतस्त: पसरवतात, त्यामुळे रोगराई देखिल पसरु शकते, ती कमी होण्यासाठी आधी कच-यावर अंकुश मिळवणे आवश्यक आहे. त्यासोबतच अन्य समस्या आपोआप मार्गी लागतील असेही ते म्हणाले. तसेच हे पद मिळाले आहे ते स्व. शिवाजी शेलार म्हणजेच वडीलांमुळे मिळाले असून त्यांना अपेक्षित असलेले चांगले काम मी करण्याचा प्रयत्न करेन असेही ते म्हणाले. त्यावेळी काँग्रेसचे ज्ेयष्ठ नेते गंगाराम शेलार, नगरसेवक राजन आभाळे, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, भाजपाचे कल्याण जिल्हा चिटणीस शशिकांत कांबळे, पूर्व मंडलाचे राजू शेख, चंदू पगारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Ward of Kalyan-Dombivali Municipal Corporation will focus on free of waste - Sai Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.