ठाणे जिल्हा न्यायालयातही न्यायाधीश, वकिलांनी पाहिले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 04:35 PM2019-01-19T16:35:01+5:302019-01-19T16:45:53+5:30

सर्वोच्च पद भूषविणाऱ्या न्यायमूर्तीनी काल स्वत: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पाहणी केली एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मतदान करून प्रात्यक्षिक पाहिले. ठाणे जिल्हा प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अधिकाधिक जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे त्याविषयीही प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश व्ही.जी.बिष्ट यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांची देखील उपस्थिती होती

VVPAT demonstration of judges and lawyers seen in Thane district court | ठाणे जिल्हा न्यायालयातही न्यायाधीश, वकिलांनी पाहिले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश व्ही.जी.बिष्ट यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील,  ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची उपस्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी व्यक्त केले समाधानठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात निवडणूक शाखेतर्फे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश व्ही.जी.बिष्ट यांनी समाधान व्यक्त केलेविभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांची देखील उपस्थिती

ठाणे : -शासन यंत्रणेचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे न्यायपालिका. या महत्वपूर्ण यंत्रणेतील सर्वोच्च पद भूषविणाऱ्या न्यायमूर्तीनी काल स्वत: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पाहणी केली एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मतदान करून प्रात्यक्षिक पाहिले. ठाणे जिल्हा प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अधिकाधिक जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे त्याविषयीही प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश व्ही.जी.बिष्ट यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील,  ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची उपस्थिती होती .  

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात निवडणूक शाखेतर्फे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सर्व स्तरांवर ही प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती सुरु आहे आणि लोकांचाही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. यासाठी ठिकठिकाणी माहिती रथ फिरत असून व्हीव्हीपॅटविषयी लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे प्रशिक्षित व्यक्तींकडून समाधान करण्यात येत असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी यावेळी या मशीन्सचे प्रात्यक्षिक दाखवून तांत्रिक बाबींची माहिती दिली. यावेळी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयाचा कर्मचारी वर्ग यांनी व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदान करून चाचणी घेतली. बार कौन्सिलच्या सदस्य वकिलांनी देखील व्हीव्हीपॅटविषयी जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.

----------

 

 


 

Web Title: VVPAT demonstration of judges and lawyers seen in Thane district court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.