मतदारांनी टीकाकारांना जागा दाखवली - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 03:39 AM2019-05-24T03:39:35+5:302019-05-24T03:40:32+5:30

ठाण्याच्या मतदारांनी बोलघेवडेपणापेक्षा काम करणाऱ्या खासदाराला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जे निवडणुकीपूर्वी टीका करत होते, त्यांनाच त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिल्याची गंभीर टीका ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

 Voters showed the place to commentators - Eknath Shinde | मतदारांनी टीकाकारांना जागा दाखवली - एकनाथ शिंदे

मतदारांनी टीकाकारांना जागा दाखवली - एकनाथ शिंदे

Next

ठाणे - ठाण्याच्या मतदारांनी बोलघेवडेपणापेक्षा काम करणाऱ्या खासदाराला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जे निवडणुकीपूर्वी टीका करत होते, त्यांनाच त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिल्याची गंभीर टीका ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा विजय दृष्टिपथावर आला असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ही टीका केली. निवडणुकीपूर्वी सुशिक्षित आणि अल्पशिक्षित असा प्रचार केला गेला होता. तशा आशयाचे बॅनरही शहरभर लागले होते. त्यानंतर, आता विचारे यांचा विजय झाल्यानंतर आता मतदारांनीच त्या टीकाकारांना उत्तरे दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या मंडळींनी केवळ टीका करण्याचेच काम राज्यात केले आहे. परंतु, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हा विजय केलेल्या कामांचा विजय आहे. विकासकामांचा विजय आहे. जनतेने पुन्हा एकदा दाखवलेल्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.

ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चारही लोकसभा मतदारसंघांतील जनतेने युतीच्या उमेदवारांवर विश्वास टाकून पुन्हा काम करण्याची संधी दिली असून त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, हा विजय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांचासुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांवर दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे.

Web Title:  Voters showed the place to commentators - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.