भारतीय पिट्टा पक्ष्याचे ठाणेकरांना दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:59 AM2019-06-16T00:59:14+5:302019-06-16T00:59:24+5:30

जखमी अवस्थेत आढळला; एसपीसीए रुग्णालयात उपचार

Visitors to Indian Cottage Party Thanekar | भारतीय पिट्टा पक्ष्याचे ठाणेकरांना दर्शन

भारतीय पिट्टा पक्ष्याचे ठाणेकरांना दर्शन

googlenewsNext

ठाणे : भारतातील इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आढळणारा भारतीय पिट्टा (नवरंग) या कमी प्रमाणात दिसणाऱ्या पक्ष्याचे तो जखमी झाल्याने ठाणेकरांना दर्शन झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याला जखमीवस्थेत ठाण्यातील एसपीसीए या पशू-पक्ष्यांवर उपचार करणाºया रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्याच्या पंखाला जखम झाली असून उपचारानंतर त्याला मुक्तसंचारासाठी लवकरच सोडण्यात येईल, असे त्याच्यावर उपचार करणारे डॉ. सुहास राणे यांनी सांगितले.

भारतीय पिट्टा प्रजातीचे पक्षी भारतात, पाकिस्तान, बांग्लादेश,नेपाळ आणि श्रीलंकामध्ये आढळून येतात. भारतात हा पक्षी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल,ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यात प्रामुख्याने आढळतो. तसेच या पक्ष्याचे वजन ४५ ते ६५ ग्रॅम इतके असून १७ ते १९ सेमी इतकी लांबी असते. त्याचबरोबर,किटक,अळ्या,मुंग्या, मुरु म,बीटल, स्पायडर, सिकाडा आणि गांडुळ हे त्याचे प्राथमिक अन्न आहे. या प्रजाती कधीकधी ग्रामीण भागात जमिनीवरून अन्न स्क्र ॅप खातात. पिट्टा प्रजातींचा प्रजनन हंगाम एप्रिल ते सप्टेंबर या काळात आहे. तर पाकिस्तानमध्ये प्रजनन ऋ तू प्रामुख्याने जुलै आणि आॅगस्ट दरम्यान आहे. हे पक्षी एकसारखे असतात. त्यांचे घरटे कोरडी पाने आणि गवतापासून बनलेले गोलाकार संरचनेतील असते. हा पक्षी चार ते पाच अंडी घालतो.

भांडुपमधील काही पक्षीप्रेमींना तो जखमीवस्थेत मिळून आला. त्यानंतर त्यांनी त्याला ठाण्यात उपचारार्थ आणले. पंखाला मार लागल्याने त्याला उडता येत नव्हते. योग्यवेळी उपचार झाल्याने तो उडण्यासाठी सज्ज झाला आहे.
- डॉ. सुहास राणे

Web Title: Visitors to Indian Cottage Party Thanekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.