नाल्यात पडून विक्रेत्याचा मृत्यू

By admin | Published: July 17, 2017 01:20 AM2017-07-17T01:20:50+5:302017-07-17T01:20:50+5:30

मुसळधार पावसाने साचलेल्या नाल्यातील कचऱ्याने दूधविक्रेत्या तरुणाचा बळी गेला. गुलशनकुमार कनोजिया (२२) असे मृत झालेल्या

Vendor's death in the drain | नाल्यात पडून विक्रेत्याचा मृत्यू

नाल्यात पडून विक्रेत्याचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मुसळधार पावसाने साचलेल्या नाल्यातील कचऱ्याने दूधविक्रेत्या तरुणाचा बळी गेला. गुलशनकुमार कनोजिया (२२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो कामतघर येथील आदर्श टॉवरमध्ये राहत होता. त्याचा दूधविक्रीचा व्यवसाय होता.
शनिवारी मध्यरात्री १ वाजता दुचाकीने शंकर डाइंगसमोरील नाल्यावरील उघड्या रस्त्यावरून घरी जात होता. पावसाचा जोर असल्याने त्याची दुचाकी घसरली. तो दुचाकीसह नाल्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. शेवटी, जेसीबीच्या मदतीने साचलेला कचरा बाजूला केला असता गुलशनकुमारचा मृतदेह व त्याची दुचाकी मिळाली. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Vendor's death in the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.