व्हॅलेंटाइन डे : ठाण्यात ४८ जोडप्यांनी साधला विवाह मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 02:18 AM2019-02-15T02:18:16+5:302019-02-15T02:18:28+5:30

प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमीयुगुले जीवनसाथी होण्यासाठी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवसाचा मुहूर्त साधतात. गुरुवारी व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

Valentine's Day: 48 couples from Tha Tha Sawala Marriage muhurat | व्हॅलेंटाइन डे : ठाण्यात ४८ जोडप्यांनी साधला विवाह मुहूर्त

व्हॅलेंटाइन डे : ठाण्यात ४८ जोडप्यांनी साधला विवाह मुहूर्त

googlenewsNext

ठाणे : प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमीयुगुले जीवनसाथी होण्यासाठी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवसाचा मुहूर्त साधतात. गुरुवारी व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या ३५ आहे, हे उल्लेखनीय.
प्रेम म्हणजे प्रेम असते. तुमचे आमचे सेम असते, ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता किंवा कुसुमाग्रजांची प्रेम कुणावरही करावे, ही कविता आजही व्हॅलेंटाइन डे ला सोशल मीडियावर फिरत असली, तरी आजही आंतरजातीय प्रेम करणाºयांना विरोध केला जातो. व्हॅलेंटाइन डेला ठाण्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात विवाहबद्ध ३५ जोडप्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या वर्षी व्हॅलेंटाइन डे ला विवाह नोंदणी कार्यालयात २२ आंतरजातीय विवाह झाले होते. त्यात यंदाच्या वर्षी १३ ने वाढ झाली आहे.
आगाऊ सूचना देऊन व्हॅलेंटाइन डे ला विवाह करणाºयांची संख्या १३ होती. गतवर्षी आगाऊ सूचना देऊन विवाह करणाºयांची संख्या २३ होती. त्यात यंदाच्या वर्षी घट झाली आहे. मात्र, अनेकांनी ‘चट मंगनी, पट ब्याह’ या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधला आहे. ज्यांना इच्छा असूनही व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधता आला नाही, ते येत्या तीन दिवसांत नोंदणी पद्धतीने विवाह करतात. नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा कल वाढतोय, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे, अशी माहिती ठाणे विवाह नोंदणी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जी.आर. पवार यांनी दिली.

Web Title: Valentine's Day: 48 couples from Tha Tha Sawala Marriage muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न