विनापरवाना रिव्हॉल्व्हरमधून झाला ठाण्यातील ‘तो’ गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:10 AM2018-12-20T05:10:46+5:302018-12-20T05:11:24+5:30

शस्त्रक्रिया करून काढली पोटातील गोळी : अनवधानाने गोळीबार झाल्याचा आरोपीचा दावा

The unlawful revolver came from 'he' firing in Thane | विनापरवाना रिव्हॉल्व्हरमधून झाला ठाण्यातील ‘तो’ गोळीबार

विनापरवाना रिव्हॉल्व्हरमधून झाला ठाण्यातील ‘तो’ गोळीबार

Next

ठाणे : किसननगर येथील एका गोदामामध्ये बसलेल्या अक्षय पवार याच्या हातून गावठी रिव्हॉल्व्हरमधून झालेला गोळीबार हा रिव्हॉल्व्हर हाताळताना नजरचुकीने झाल्याचा दावा त्याने श्रीनगर पोलिसांकडे केला आहे. त्याच्याकडे या रिव्हॉल्व्हरचा परवाना नसून त्याने ती कोणाकडून आणली, या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. तर, गोळीबारात जखमी झालेल्या विजय यादव (२०) याच्यावर वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून यशस्वीरीत्या गोळी काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अक्षय (रा. शिवशक्ती निवास, किसननगर, ठाणे), विजय आणि अवधेश यादव असे तिघे मित्र किसननगर येथील इस्टेट एजंट ऋषिकेश माने यांच्या गोदामामध्ये १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा.च्या सुमारास बसले होते. त्याचवेळी अक्षयने आपल्याकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे विजयला सांगितले. ती खोटी असावी, या शक्यतेने रिव्हॉल्व्हर बघण्याची उत्सुकता विजयनेही दाखवली. ती आपल्या मित्रांना दाखवताना निष्काळजीपणे हाताळल्यामुळे अक्षयच्या हातून गोळीबार झाल्याने विजयच्या पोटाला गोळी लागली. अक्षयने तातडीने त्याला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रिव्हॉल्व्हर हाताळताना हा प्रकार घडल्याचा दावा अक्षयने पोलिसांकडे केला. तशीच माहिती विजय आणि अवधेश यांनीही दिली.
पण, विनापरवाना त्याने ते हाताळले. शिवाय, पोलीस आयुक्तांचा मनाई आदेशाचा भंग करून ते स्वत:कडे बाळगले. त्याने ते कोणाकडून आणले, याची मात्र त्याच्याकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ते कचऱ्यात मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. ते कचºयात मिळाले होते, तर त्याने ते पोलीस ठाण्यात जमा का केले नाही? किंवा याची त्याने पोलिसांना रीतसर माहिती का दिली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी विजयचा चुलत भाऊ संदीप यादव याने मंगळवारी रात्री ११ वा.च्या सुमारास तक्रार दाखल केली.

घटनास्थळाला पोलिसांची भेट; आरोपीला कोठडी
च् पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांच्या पथकाने अक्षयला अटक केली. त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

च्घटनास्थळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, निरीक्षक सुनील पंधरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक दिनेश चव्हाण तपास करत आहेत.

Web Title: The unlawful revolver came from 'he' firing in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.