कलानी विरूद्ध आयलानी सामना रंगणार, उल्हासनगरचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:20 AM2018-02-20T01:20:59+5:302018-02-20T01:21:33+5:30

सत्तेवर येण्यासाठी वापर करून घेतल्यानंतरही पदांचा लाभ देण्यात भाजपाच्या एका गटाने केलेली खळखळ, साई पक्षाला हाताशी धरून केलेली कोंडी, भाजपातील

Ulhasnagar politics will be played against Kallani | कलानी विरूद्ध आयलानी सामना रंगणार, उल्हासनगरचे राजकारण तापले

कलानी विरूद्ध आयलानी सामना रंगणार, उल्हासनगरचे राजकारण तापले

Next

सदानंद नाईक
उल्हासनगर : सत्तेवर येण्यासाठी वापर करून घेतल्यानंतरही पदांचा लाभ देण्यात भाजपाच्या एका गटाने केलेली खळखळ, साई पक्षाला हाताशी धरून केलेली कोंडी, भाजपातील असंतुष्टांमुळे सतत होणाºया घुसमटीला कंटाळून ओमी कलानी टीमने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओमी भाजापातून फुटल्यास त्यांना पाठबळ देण्याची भूमिका शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपाला थेट आव्हान निर्माण झाले आहे.
भाजपाचे माजी आमदार कुमार आयलानी हे सध्या पक्षाचे शहरअध्यक्ष आहेत, तेच पक्षाचे विधानसभेचे पुढील उमेदवार असतील. सत्तेत सोबत असूनही त्यांनी ओमी टीमची कोंडी चालवल्याचा आक्षेप घेतला जात आहे. ओमी टीमला भाजपात प्रवेश देण्यास त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला होता. मात्र त्या टीममुळे भाजपाचे संख्याबळ वाढल्याने, सत्ता मिळाल्याने त्यांचा विरोध फारसा खपवून घेतला गेला नाही. त्यानंतर साई पक्षाला सोबत घेत त्यांनी ओमी टीमला पदांपासून रोखले. एव्हढेच नव्हे, तर पदांच्या विभागणीनुसार येत्या दोन महिन्यात आपल्या पत्नीला महापौरपद सोडावे लागणार असल्याने त्यांनी साई पक्षाला हाताशी धरून पाठिंबा काढण्याची खेळी खेळल्याची चर्चा रंगली आहे. आता सर्व मागण्या मान्य झाल्यानंतरही साई पक्ष पाठिंबा कायम ठेवण्याबाबत उलटसुलट विधाने करत असल्याने ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम यांना महापौरपदापासून रोखण्यासाठी सारे प्रयत्न सुरू असल्याची उघडउघड चर्चा सुरू आहे. त्यामुळेच सध्या राष्ट्रवादीच्या आमदार असलेल्या ज्योती कलानी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गोल मैदानात केलेल्या शक्तीप्रदर्शनावेळी कलानी कुटुंब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करत भाजपातील विरोधकांना थेट इशारा दिला. या कार्यक्रमाला ओमी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते, तर त्यांची पत्नी व्यासपीठावर होती. मात्र या घडामोडींवर भाजपाने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ज्योती यांच्या भूमिकेकडे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आलेल्या ज्योती कलानी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा आहेत. तरीही त्या पक्षाच्या एकाही स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे त्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे किंवा त्या त्याच पक्षात राहून ओमी यांना मदत करतील, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

ओमी हेच उमेदवार : पप्पू कलानी यांच्या तुरूंगवासाच्या काळात ज्योती यांनी राजकारणात जम बसवला. विधानसभा निवडणूक लढवून त्या आमदारही झाल्या. त्यांची सून आणि ओमी यांची पत्नी पंचम या मे महिन्यात उल्हासनगरच्या महापौर होतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे ओमी कलानी हेच कुमार आयलानी यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवतील, असे मानले जाते. ज्योती कलानी यांनी मात्र नेमके कोण निवडणूक लढवेल हे जाहीर केलेले नाही. उमेदवार कलानी कुटुंबातील एक असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्यावर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागानुसार उमेदवार निश्चित करून ओमी यांनी उल्हासनगरच्या राजकारणाचा अभ्यास केला. सिंधी राजकारणावरील आपल्या कुटुंबाची पकड कायम ठेवण्याची तयारी केली. सध्या भाजपाच्या नगरसेवकांपैकी निम्मे ओमी यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक डोळ््यापुढे ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. प्रभाग आणि विषय समित्यांच्या निवडणुकीवेळी शिवसेनेची मदत घेत त्यांनी भाजपाला इशारा दिला होता. आताही साई पक्ष आणि भाजपातील विरोधकांनी मोहीम उघडल्यावरही ते प्रतिक्रिया न देता शांत आहेत. विधानसभा निवडणुकीला पुरेसा अवधी असतानाही त्यांच्या कुटुंबाने रणशिंग फुंकले असून सिंधी भाषक मतदारांपर्यंत योग्य संदेश पोचवला आहे.
 

Web Title: Ulhasnagar politics will be played against Kallani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.