यू-टाइप रस्ताबाधित झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:59 PM2019-01-18T23:59:26+5:302019-01-18T23:59:52+5:30

केडीएमसीबाहेर चार तास ठिय्या : पोलिसांची मध्यस्थी, आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

U-Type road obstructed | यू-टाइप रस्ताबाधित झाले आक्रमक

यू-टाइप रस्ताबाधित झाले आक्रमक

Next

कल्याण : पूर्वेतील यू-टाइप रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करा तसेच रहिवासी व दुकानदार यांना भयभीत करणे न थांबवल्यास केडीएमसी मुख्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पुनर्वसन कृती समितीने दिला होता. परंतु, प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी मोर्चा काढत चार तास मुख्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडला. अखेर, पोलिसांची मध्यस्थी आणि आयुक्त गोविंद बोडके यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


अनेक वर्षे रखडलेल्या काटेमानिवलीनाका ते गणपती मंदिर ते पोटे अपार्टमेंट ते तिसगावनाका या यू-टाइप रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ९ जानेवारीपासून केडीएमसीने सर्वेक्षण सुरू केले होते. परंतु, मोजणी करणाऱ्या अधिकाºयांना रोखत जोपर्यंत पुनर्वसन धोरण ठरवले जात नाही, तोपर्यंत कोणतेही काम करू दिले जाणार नाही, असे रहिवासी व व्यापाºयांनी सुनावले होते. या रस्त्याच्या तीन वेळा झालेल्या रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे आधी पुनर्वसन करा, अन्यथा तुमच्या मालमत्तांचा ताबा घेऊ, असा इशारा समितीने दिला होता. मात्र, प्रशासनाने रुंदीकरणांतर्गत मोजणीची प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात सुरूच ठेवल्याने बाधित होणाºयांनी हजारोंच्या संख्येने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर धडक दिली. मोर्चातील सहभागी व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली होती.


पूर्वेतील सिद्धार्थनगरमधून हा मोर्चा सुरू झाला. तो स्कायवॉकवरून पश्चिमेतील बाजारपेठ, शिवाजी चौकमार्गे केडीएमसीवर धडकला. सकाळी ११.३० वाजता आलेला हा मोर्चा महापालिकेसमोर पोलिसांनी रोखला. आयुक्त व कोणताही वरिष्ठ अधिकारी मोर्चाला सामोरा न आल्याने आंदोलनकर्त्यांच्या संतापात अधिकच भर पडली. त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत आयुक्त, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली. आयुक्त चर्चेला येत नाहीत, तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा मोर्चेकºयांनी घेतला. तर, आम्ही चर्चेला येणार नाही. त्यांच्या शिष्टमंडळाने यावे, असा पवित्रा अधिकाºयांनी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.


रस्ता रुंदीकरणात मोठा भ्रष्टाचार आहे. भूमाफियांना जादा एफएसआय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आरोपही करण्यात आले. रस्त्याचे आधी तीनदा रुंदीकरण झाले. परंतु, बाधित झालेल्या १६ जणांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. काही जणांना पुनर्वसन करू, असे आश्वासन देत सर्वेक्षण करण्यात आले. परंतु, अजूनही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. मोर्चेकºयांनी रस्ता अडवल्याने शंकरराव चौकातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. दुपारी ३.३० च्या सुमारास आयुक्त बोडके मुख्यालयात आले, तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत आयुक्त आणि मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा घडवून आणली.

केडीएमसीच्या ‘जे’ प्रभागाशेजारील इमारतीला लावले सील
कोळसेवाडी : यू-टाइप रस्त्याच्या ८० फुटी रुंदीकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी कल्याण पूर्वेतील नागरिकांनी तेथील केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग कार्यालयाशेजारील महापालिकेच्या इमारतीला टाळे ठोकून सील लावले.
कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली ते कोळसेवाडी, सिद्धार्थनगर ते तीसगावपर्यंतचा यू-टाइप रस्ता ८० फूट रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, यापूर्वी रस्त्यात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन न झाल्याने नागरिकांनी पुन्हा रुंदीकरणास विरोध दर्शवला आहे.
उदय रसाळ यांच्या नेतृत्वाखाली पुनर्वसन समितीने यासंदर्भात रहिवाशांच्या बैठका घेऊन त्यात जागृती केली. त्यामुळे पुनर्वसनाचे धोरण ठरवल्याशिवाय रस्ता
रु ंद करू देणार नाही, अशी भूमिका घेत या दोन्ही मार्गांवरील रहिवासी व दुकानदारांनी एकजुटीने शुक्रवारी महापालिका इमारतीला टाळे ठोकले.

‘ती’ प्रक्रिया चुकीची
जी प्रक्रिया सुरू केली होती, ती चुकीची होती, हे आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तूर्तास ही प्रक्रिया थांबवून कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतरच पुढील कार्यवाही करू, असे आश्वासन बोडके यांनी दिले. त्यामुळे आम्ही तूर्तास आंदोलन मागे घेत असल्याची माहिती पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनी दिली. कल्याण पूर्व भाग दाटीवाटीचा नाही. त्यापेक्षा कल्याण पश्चिमेचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे पश्चिमेबरोबर पूर्वेचा आराखडा एकत्रित आणा. आम्ही मंजुरी देऊ, याकडेही बोडके यांचे लक्ष वेधल्याचे रसाळ म्हणाले.

Web Title: U-Type road obstructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.