दिवसातून दोन वेळाच जेवा... तीन महिन्यात वजन घटेल, डायबेटिस पळेल : डाॅ. जगन्नाथ दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 04:01 PM2019-01-12T16:01:37+5:302019-01-12T16:03:01+5:30

वजन कमी करण्याचा सुप्रसिद्ध डायट सल्लागार डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांनी कानमंत्र ठाणेकरांना दिला. 

Two times a day, weight reduces in just three months, the stomach will decrease, diabetes will be removed: Dr. Jagannath Dixit | दिवसातून दोन वेळाच जेवा... तीन महिन्यात वजन घटेल, डायबेटिस पळेल : डाॅ. जगन्नाथ दीक्षित

दिवसातून दोन वेळाच जेवा... तीन महिन्यात वजन घटेल, डायबेटिस पळेल : डाॅ. जगन्नाथ दीक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देअवघ्या तीन महिन्यात वजन कमी होईलपोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल डायट सल्लागार डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांची जाहीर हमी

ठाणे : दिवसातून फक्त दोन वेळा जेवा अवघ्या तीन महिन्यात वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल, अशी जाहीर हमी सुप्रसिद्ध डायट सल्लागार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिली आहे. आपल्या 'वेट लॉस प्लॅन'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आणि सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक लाईक्स मिळविणाऱ्या डॉ. दीक्षित यांनी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले. त्यावेळी "स्थूलत्व आणि मधुमेह मुक्ती" या विषयावर ते बोलत होते. 

कडक भूक लागेल तेव्हा खा, दिवसातून फक्त दोन वेळा जेवणाचा आनंद घ्या, अगदी पिझ्झासकट काहीही, कितीही खा, एक पदार्थ खा किंवा दहा पदार्थ खा काहीही फरक पडत नाही, मन मारू नका - हवे ते खा, दोन वेळच्या जेवणाचे स्वतःचे पॅटर्न ठरवा, फक्त 55 मिनिटांच्या आत मात्र जेवण संपवा, जेवणात गोड कमी खा, साखर-गूळ-मध याचे व्यसन लावू नका, नारळ पाणी प्या पण नारळातली तसेच दुधावरची मलई खाऊ नका, भरपूर पाणी प्या, दुधाचा चहा प्यायचा असेल तर 25 टक्के दूध व 75 टक्के पाणी टाकून प्या पण शक्यतो बिनसाखरेचा चहा घ्या, ग्रीन टी- ब्लॅक टी प्या,  दोन वेळच्या जेवणाच्या मध्ये भूक लागली तर एखादा टोमॅटो खा, 45 मिनिटात 4.5 मिनिटे चाला, अशा अनेक मोलाच्या टिप्स डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिल्या. सवय नसल्याने सुरुवातीला याचा त्रास होईल पण आठवडाभर नियमितपणे दिवसभरात दोन वेळेच्या जेवणाचे पॅटर्न पाळले की याचीही सवय होईल आणि अवघ्या तीन महिन्यात वजन किमान 8 किलो कमी होईल, पोटाचा घेर किमान 2 इंचाने कमी होईल, टाईप टू चा डायबेटिस दूर होईल, असे त्यांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं. 

जेवण वाया कसं काय घालवायचं?, अशा विचारामुळे आपल्या देशाच्या महिला लठ्ठ झाल्या आहेत. आपण घरातल्या डस्टबीनची काळजी करता पण शरीराचे डस्टबीन होत आहेत त्याची काळजी करत नाही. यामुळेच अनावश्यक वजन वाढते, पोटाचा घेर वाढतो, गुडघेदुखी, स्नायुदुखीचा त्रास उद्भवतो. या चुकीच्या आहारामुळे आता लहान मुलांना टाईप वन चा डायबेटिस होतो तर ज्येष्ठांना टाईप टू चा डायबेटिस होत आहे. भारतात  20 टक्के लोकांना डायबेटिस आहे. बिनकामाचे इन्शुलिन्स निर्माण झाल्यामुळे डायबेटिस होतो. इन्शुलिन्सची लेव्हल वाढली की शरीरातील पेशी विरोध करतात. यामुळे इन्शुलिन्सचे योग्य माप शरीरात निर्माण व्हायला हवे. माप रिकामे झाले की भरायला  55 मिनिटे जातात. रक्तातले ग्लुकोज पेशीत पोहोचते, पेशी ग्लुकोज साठवतात आणि अनावश्यक चरबीच्या स्‍वरूपात निर्माण झालेल्या फॅटी सीडला रोखण्याचे काम करतात. वारंवार खात राहिलात तर इन्शुलिन्स लेव्हल वाढेल. यामुळे दोन वेळा जेवा आणि खाणे-पिणे  55  मिनिटात आटोपा. 6 ते 8 तास झोप घेतल्यावर दिवसातून दोन वेळा जेवताना जेवणाआधी एक तास अगोदर पाणी प्या, जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या, गरज वाटलीच तर जेवताना घोटघोट पाणी प्या, जेवल्यानंतर एक तास झोपू नये, दुपारी अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नये, दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या, दिवसातून सव्वा ते दीड लिटर लघवी होईल इतके पाणी प्या, असा सल्ला डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला. 

आपल्याकडे दोनवेळच्या जेवणाची प्रथा होती. आपणाकडे कधीही नाश्ता करण्याची पद्धत नव्हती. राम-कृष्ण नाश्ता करत असल्याचा उल्लेख पुराणात नाही. आपले पूर्वज नाश्ता करत असल्याचा कोणताही उल्लेख वेदात नाही की ग्रंथात नाही. नाश्ता हा प्रकार ब्रिटिशांनी आणला त्यांनी चहा आणला आणि फुकट वाटला. तेव्हापासून चहा-नाश्ता हा प्रकार सुरु झाला. दिवसातून दोन वेळा जेवा असा उल्लेख आयुर्वेदत आहे. दोन वेळा जेवा पुण्य मिळेल असे आयुर्वेदात म्हटले आहे. जैन धर्मात बेसना ही पद्धत आहे. म्हणजे दोन वेळा बसून जेवा. गौतम बुद्धांनी तर एकदाच जेवा, रात्री जेवू नका असे म्हटले आहे. ग्रीक मधील नागरिक सर्वात तंदुरुस्त समजले जात. कारण ते दोनदाच जेवत. आपल्याकडे संतांनी सांगितले आहे की एक वेळा जेवणारा योगी, दोन वेळा जेवणाच भोगी, तीन वेळा जेवणारा रोगी व चार वेळा जेवणारा महारोगी. आता यातून योग्य तो बोध घ्या, असे सांगून डॉ. दीक्षित म्हणाले की, अधिकचे खाण्याने जास्त लोक मरतात पण उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही. आपण  60 दिवस उपाशी राहू शकतो. आपले पूर्वज शिकार मिळायची तेव्हाच खायचे नाहीतर उपाशी रहायचे. 

शालेय विद्यार्थी जागृती अभियानाद्वारे आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना, "चार वेळा खा, गोड कमी खा, कोल्ड्रींग पिऊ नका, मोबाईलवर फुटबॉल न खेळता मैदानावर खेळा, असे विद्यार्थ्यांना सांगत आहोत तर डायबेटिस रिव्हर्स सेंटर द्वारे ठाण्यात दर गुरुवारी सकाळी  8 ते 12 यावेळेत सहयोग हॉल, घंटाळी येथे मोफत सल्ला केंद्र सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.  डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आणि श्रीकांत जिचकार यांनी सुरू केलेला हा प्रयोग आपण पुढे नेत आहोत, अशी कृतज्ञता व्यक्त करुन, तुमचं आरोग्य तुमच्या हाती आहे. मानवतेच्या सेवेसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा प्रयोग सुरु करा, असे आवाहन शेवटी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. 

Web Title: Two times a day, weight reduces in just three months, the stomach will decrease, diabetes will be removed: Dr. Jagannath Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.