दोन लाख ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा ठाण्यात हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:42 PM2018-02-14T18:42:43+5:302018-02-14T18:50:46+5:30

६0 हजार रुपयात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा विकणार्‍या झारखंडच्या एका आरोपीस ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या.

 Two lakh 31 thousand rupees fake notes seized in Thane | दोन लाख ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा ठाण्यात हस्तगत

दोन लाख ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा ठाण्यात हस्तगत

Next
ठळक मुद्देठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाईझारखंडच्या आरोपीस अटक६0 हजार रुपयात एक लाखाच्या नोटा

ठाणे : बनावट नोटा विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या झारखंडच्या एका आरोपीस खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी ठाण्यात अटक केली. आरोपीजवळून सुमारे २ लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.
प्रकास प्रसाद उर्फ शंकर टोकल मोहतो (४२) हे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, तो ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील धर्मविरनगरचा रहिवासी आहे. मिस्त्री काम करणारा हा आरोपी मुळचा झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्याचा रहिवासी आहे. ६0 हजार रुपयात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा विकण्याचा धंदा आरोपी करीत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाच्या अधिकार्‍यानी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी ग्राहक बनून आरोपीशी संपर्क साधला. त्याला पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या बनावट नोटा मागितल्या होत्या. मंगळवारी दुपारी ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर बनावट नोटा घेऊन येण्यास आरोपी तयार झाला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एस.आर. गावंड, एच.ए. ढोले आणि व्हि.के. बाबर आदींच्या पथकाने सापळा रचला. दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास आरोपी ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर पोहोचताच पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. आरोपीची अंगझडती घेतली असता २ हजार रुपयांच्या ११३ आणि नवीन ५00 रुपयांच्या १0 बनावट नोटा त्याच्याजवळ आढळल्या. याशिवाय १00 रुपयांच्या दोन खर्‍या नोटाही त्याच्याजवळ होत्या. एकूण २ लाख ३१ हजार २00 रुपये पोलिसांनी आरोपीजवळून हस्तगत केले. आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याविरूद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title:  Two lakh 31 thousand rupees fake notes seized in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.