कल्याण ग्रामीणसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:13 PM2018-12-21T17:13:51+5:302018-12-21T17:20:12+5:30

महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात विकासाची कामे होण्यासाठी भोईर यांनी मुख्यमंत्री, तसेच नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार पायाभूत सोयी सुविधांकरीता दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

 Two crores fund sanctioned for Kalyan rural | कल्याण ग्रामीणसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

कल्याण ग्रामीणसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

Next
ठळक मुद्देमहापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात विकासाची कामे होण्यासाठी भोईर यांनी मुख्यमंत्री, तसेच नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता.पायाभूत सोयी सुविधांकरीता दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.दोन कोटी रुपयांना शासनाने मंजुरी दिली असून लवकरच त्या कामांना सुरुवात होणार.

डोंबिवली - कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण ग्रामीण मतदार संघात येत असलेल्या डोंबिवली शहर व २७ गावातील विविध विकासकामांकरिता दोन कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून आमदार सुभाष भोईर पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात विकासाची कामे होण्यासाठी भोईर यांनी मुख्यमंत्री, तसेच नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार पायाभूत सोयी सुविधांकरीता दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सोनारपाडा येथील तलावाचे सुशोभिकरण करणे २० लाख, मानपाडा तलाव सुशोभीकरण व विसर्जन घाट करणे १० लाख, कोळेगाव, पेंढारकर महाविद्यालय व लोढा पालावा येथे प्रवासी निवारा शेडचे बांधकाम करणे १५ लाख, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी चौकाचे सुशोभीकरण करणे २० लाख, गोळवली येथे पांडुरंगवाडी ते जि.प. शाळेपर्यंत रस्ता १५ लाख, काटई गावातील चेतना हॉटेल व अमित पाटील यांच्या घराजवळ पायवाटा ५ लाख, प्रभाग क्र.१११ मधील गोल मैदान आशापुरा मातामंदिर येथे जेष्ठ नागरिक कट्टा व बैठक व्यवस्था करणे १० लाख, आडीवली गावातील तलावाचे सुशोभीकरण १० लाख, उसरघर गावात स्मशानभूमीमध्ये पेव्हरब्लॉक बसविणे ५ लाख, आजदेपाडा येथील आयप्पा मंदिर रोड ते बाबुराव पाटील नगर कमानी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

काटई गावातील मोहाचा पाडा येथील रस्ता करणे ५ लाख, घारीवली गावात स्मशानभूमी बांधणे १० लाख, मानपाडा गावातील स्मशानभूमीची दुरुस्ती १० लाख, हेदुटणे कोळेगाव प्रभागात गणेश विसर्जन घाट बांधणे १० लाख, पिसवली राधाकृष्ण पार्क परिसरात पोहोच रस्ते करणे ५ लाख, भाल गाव येथे व्यायामशाळा बांधणे ५ लाख, , कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत उद्यानात आसनव्यवस्था करणे १० लाख, आनंद नगर, गांधीनगर प्रभागातील चैतन्य सोसायटी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, गोग्रासवाडी, साकार रेसिडेन्सी ते गौरव निवास रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच ज्ञानपरीस शैक्षणिक व सामाजिक संस्था एमआयडीसी, आजदे, जिल्हापरिषद शाळा नांदिवलीपाडा, श्रीगणेश विद्या प्रसारक मंडळ, स्टार कॉलनी, गणेश नगर, मानपाडारोड, चौगुले विद्यालय, सोनारपाडा, जिल्हापरिषद शाळा, नांदिवली, जिल्हापरिषद शाळा भाल, जिल्हापरिषद शाळा पिसवली शाळांना संगणक पुरविणे १० लाख, अशा प्रकारे एकूण दोन कोटी रुपयांना शासनाने मंजुरी दिली असून लवकरच त्या कामांना सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले.
 

Web Title:  Two crores fund sanctioned for Kalyan rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण