स्वातंत्र्यदिनी जंगलात वाट चुकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात काढले शोधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 06:34 PM2017-08-16T18:34:59+5:302017-08-16T18:35:26+5:30

मंगळावारी स्वातंत्र्य दिनी कजर्त तालुक्यांतील कोंढाणो येथे निसर्ग भ्रमंतीकरीता गेलेल्या आणि सूर्यास्ता नंतर काेंढाणे जंगलात वाट चूकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात शोधून काढले

The tribal brothers took out four of the four abandoned victims in the freedom struggle | स्वातंत्र्यदिनी जंगलात वाट चुकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात काढले शोधून

स्वातंत्र्यदिनी जंगलात वाट चुकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात काढले शोधून

Next

जयंत धुळप
काेंढाणे, दि. 16 -  मंगळावारी स्वातंत्र्य दिनी कजर्त तालुक्यांतील कोंढाणो येथे निसर्ग भ्रमंतीकरीता गेलेल्या आणि सूर्यास्ता नंतर काेंढाणे जंगलात वाट चूकलेल्या मुंबईतील बोरिवली येथील स्वप्नील मगदूम(24), मिश्वाल सॅलियन(24), ज्योती पळसमकर(20), ज्यूली डिसोझा(22) या चौघा ट्रेकर्सना, रातोरात उंबरवाडी मधील आदिवासी बांधव एरू जाणू मेंगार, मधु हिरू पीटकर, वाळकु कमळू निरगुडा यांनी चार तासात शोधून काढून कजर्त पोलीसांना मोठे सहकार्य केले आहे. 
    मंगळवारी रात्री 9.45 वाजता वाट चूकलेल्या या चौघांपैकी स्वप्नील कदम यांने  कर्जत पोलीस ठाण्यात फोन करुन, मी व माझ्या सोबतचे एक मित्न व दोन मैत्रिणी काेंढाणे येथील जंगलात वाट चुकले असून, जंगलात भरकटलो आहेत ,अशी माहिती दिली. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी, प्रसंगाचे गांभिर्य ओळखून, त्यांना आहात त्याच ठिकाणी एखाद्या सपाट जागेवर थांबून राह्ण्याचा सल्ला दिला. स्वप्नील यास आजूबाजूच्या खाणाखुणा विचारल्या. त्यावेळी त्यांनी, बाजूला उंचावरून पाणी पडत असल्याचे सांगितले. परिणामी जवळ धबधब्या असल्याचा अंदाज बांधून पोलीस निरीक्षक तानवडे यांनी त्वरित कोडाणो गावचे पोलीस पाटील रवींद्र महादेव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्याबाबत काय काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली.
         रात्नीची वेळ असल्याने या मुलांची सुटका करणो अवघड असतानाही पोलीस निरीक्षक तानवडे यांनी कोढाणो गावांतील स्थानिक आदिवासी बंधूंची मदत घेवून कर्जत पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एम.बी. शिंदे, पोलीस शिपाई एस.एस.सहाणो, महिला पोलीस कर्मचारी ए.एस.जाधव व सहा फौजदार बजरंग मुसळे असे सरकारी जीपसह रवाना झाले. काेंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र गायकवाड व आदिवासी बंधू एरू जाणू मेंगार, मधु हिरू पीटकर, वाळकु कमळू निरगुडा (सर्व रा. उंबरवाडी) यांच्या मदतीने जंगल भागात अंधारात धबधबा शोधण्यास प्रारंभ केला. अत्यंत मेहनतीने व मोठ्या धाडसाने एक ते दीड तासाने धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने जंगल पादाक्रांत करुन, या चौघां र्पयत पोहोचण्यात या पथकास यश आले. आणि  स्वप्नील मगदूम, मिश्वाल सॅलियन, ज्योती पळसमकर, ज्यूली डिसोझा या चौघांना जंगलातून गावांत सुखरुप आणण्यात यश मिळविले आहे.
    अपरिचित जंगल भागात निसर्ग पर्यटनाकरिता जावून जीवावर आढावून घेण्याचा प्रसंग रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत दुस:यांदा घडला असून, केवळ पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहयोगामुळे प्राण वाचले आहेत. 
 

Web Title: The tribal brothers took out four of the four abandoned victims in the freedom struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.