ठाणे - ठाणे-पनवेल दरम्यानची ट्रान्स हार्बर सेवा विस्कळीत झाली आहे. घणसोली स्थानकामध्ये लोकलचे कंपलिंग तुटून डबे वेगळे झाल्याने लोकल खोळंबली आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवेचा खोळंबा झाला आहे. संध्याकाळच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.