आसनगाव - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आसनगाव- खर्डी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे कसा-याकडे जाणारी वाहतूक केवळ आसनगावपर्यंत सुरू आहे. आटगावदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे.

या खोळंब्यामुळे भागलपूर एक्स्प्रेस आटगाव स्थानकात तर पुष्पक एक्स्प्रेस व एक कसारा लोकल आसनगाव स्थानकात उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.