ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती, प्रधान सचिवांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 06:34 PM2018-06-20T18:34:56+5:302018-06-20T18:37:41+5:30

ठाणे महापालिकेच्या वतीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे ठाण्यात पर्यटन विकासासाठी संधी असल्याची माहिती राज्य शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी दिली.

Tourist tour of the tourism department in Thane, Principal Secretary gave a visit | ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती, प्रधान सचिवांनी दिली भेट

ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती, प्रधान सचिवांनी दिली भेट

Next
ठळक मुद्देपर्यटन स्थळांची माहिती द्यावीविविध प्रकल्पांचे पालिकेने केले सादरीकरण

ठाणे - ठाणे शहरातंर्गत उपवन येथे निर्माण करण्यात आलेल्या अ‍ॅम्पी थिएटर अंतर्गत जलवाहतूक तसेच येऊर येथील प्रस्तावित आदीवासी संस्कृती आणि कला केंद्राच्या माध्यमातून पर्यटनाला चालणा देणाऱ्या संधी निर्माण करण्यास राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी व्यक्त केले. बुधवारी गौतम यांनी विविध ठिकाणी भेट देवून पर्यटन विभाग ठाणे महानगरपालिकेस सर्वतोपरी सहकार्य करेल असे स्पष्ट केले.
                                             दरम्यान गौतम यांनी महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाºया महत्वपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमोर अंतर्गत जलवाहतूक, चेजींग फेस आॅफ ठाणे अंतर्गत असलेले महत्वाचे प्रकल्प, पारसिक, नागला बंदर चौपाटी आदी महत्वाच्या प्रकल्पांची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत ठाणे शहरामध्ये निर्माण होत असलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांतर्गत उभ्या करण्यात येणाºया जेटींवर पर्यटकांसाठी माहिती केंद्रे आणि त्या माध्यमातून ठाणे शहर आणि परिसरामधील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती पर्यटन विभागाच्यावतीने दर्शविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना गौतम यांनी केली. त्याचबरोबर कोलशेत येथे निर्माण करण्यात येणाºया बहुउद्देशीय वाहतूक हबच्या ठिकाणी ठाणे शहरातील आणि परिसरातील महत्वाची पर्यटन स्थळे, तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती देणारे केंद्र उभे करण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखिवली.
या बैठकीनंतर गौतम यांनी महापालिका आयुक्त यांच्या समवेत येऊर येथील प्रस्तावित आदीवासी कला व संस्कृती केंद्राच्या जागेची पाहणी करून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपवन येथे उभारण्यात आलेल्या अ‍ॅम्पी थिएटर आणि सिंधू घाट या ठिकाणी भेट देवून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्यावतीने पुढाकार घेतला जाईल असे सांगितले. याबाबत महापालिकेकडून पर्यटन विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांनी नागला बंदरच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठाणे शहरामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



 

Web Title: Tourist tour of the tourism department in Thane, Principal Secretary gave a visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.