कल्याण रेल्वे स्थानकात प्रसंगावधान राखत टीसीने वाचवले प्रवाशाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:54 PM2018-02-16T17:54:18+5:302018-02-16T17:56:18+5:30

धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या गाडीच्या आणि फलाटामधील अंतरात सापडलेल्या एका युवकाचा जीव अंबरनाथ येथिल रहिवासी मध्य रेल्वेत २६ वर्षांपासून सेवेत असलेले मुख्य तिकिट तपासनीस शशिकांत चवहाण यांनी वाचवला. त्यामुळे त्यांचे रेल्वे कर्मचा-यांमधून कौतुक होत आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात शक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर घडली.

Tony saved the survivors of the Kalyan railway station | कल्याण रेल्वे स्थानकात प्रसंगावधान राखत टीसीने वाचवले प्रवाशाचे प्राण

कानसई प्रतिष्ठानतर्फे चव्हाण यांचा सत्कार

Next
ठळक मुद्देशक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर घडली घटनाकानसई प्रतिष्ठानतर्फे चव्हाण यांचा सत्कार

डोंबिवली: धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या गाडीच्या आणि फलाटामधील अंतरात सापडलेल्या एका युवकाचा जीव अंबरनाथ येथिल रहिवासी मध्य रेल्वेत २६ वर्षांपासून सेवेत असलेले मुख्य तिकिट तपासनीस शशिकांत चवहाण यांनी वाचवला. त्यामुळे त्यांचे रेल्वे कर्मचा-यांमधून कौतुक होत आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात शक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर घडली.
पाटील हे पुष्पक एक्स्प्रेसने मुंबई ते कल्याण गाडी चेकींग करत आले होते. कल्याण येथे ते उतरले, सहकार्यांसमवेत उभे असतांना त्यांना संदीप सोनकर या युवक गाडी आणि फलाटाच्या मध्ये अडकला असल्याचे जाणवले, त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत संदीपचे प्राण वाचवले. सुरु झालेली गाडी तात्काळ उभी करण्यासाठी सूचना देत युवकाला सहीसलामत बाहेर काढले. पाटील यांनी प्रसंगावधान राखत संदीपचा जीव वाचावा यासाठी धडपड केली, त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अंबरनाथच्या कानसई प्रतिष्ठानतर्फे चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर्णा भोईर, शेखर ठाकरे, जगदीश हडप आदी उपस्थित होते. या संदर्भात कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही, या पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दिनकर पिंगळे म्हणाले की, अपघाती जखमी, अथवा मृत झाला तर नोंद असते, पण अशा घटना घडल्या तर त्यासंदर्भात कोणीही माहिती देत नाही.

Web Title: Tony saved the survivors of the Kalyan railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.