आरोग्यसेवेचे वाजले उल्हासनगरमध्ये तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 03:24 AM2018-07-16T03:24:22+5:302018-07-16T03:24:34+5:30

शहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते.

Three years into healthcare, Ulhasnagar | आरोग्यसेवेचे वाजले उल्हासनगरमध्ये तीनतेरा

आरोग्यसेवेचे वाजले उल्हासनगरमध्ये तीनतेरा

Next

- सदानंद नाईक
शहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, उल्हासनगर पालिकेला याचा विसर पडलेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार आरोग्यासाठी विविध योजना राबवत आहे. मात्र, उल्हासनगर पालिकेत सत्तेत असलेली भाजपा आरोग्याच्या दृष्टीने कुठलीच पावले उचलताना दिसत नाही. हाच का पारदर्शक कारभार, असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे.
औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगरमधील आरोग्यसेवा कागदावरच असल्याने शहरच व्हेंटिलेटरवर आहे. नऊ लाख लोकसंख्येसाठी पालिकेचे एकही मोठे रुग्णालय नसून आरोग्याची सर्व मदार आरोग्य केंद्रावर आहे. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र बंद असून इतरांची दुरवस्था झाली आहे. तेथील चित्र पाहिले तर ही आरोग्य केंदे्र नसून कचराकुंडी वाटावी इतकी तिथे घाण, दुर्गंधी पसरलेली आहे.
महापालिकेने अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेले रूग्णालय उभारण्यासाठी महासभेत अनेकदा प्रस्ताव मंजूर केले. मात्र, रुग्णालयासाठी मंजूर केलेली जागा कालांतराने भूमाफियांनी घशात घातली. सत्ताधाºयांसह विरोधी पक्ष याविरोधात आवाज उठवत नसल्याने रुग्णालय उभे राहू शकले नाही. यातूनच सामान्यांबद्दल नेते, प्रशासन यांना काहीही वाटत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या दबावापोटी लोकसंंख्येच्या प्रमाणात महापालिका आरोग्य विभागाने सहा ठिकाणी आरोग्य केंदे्र सुरू केली, तर चार ठिकाणी प्रस्तावित आरोग्य केंदे्र असून काही ठिकाणी केंद्रांच्या इमारतींचे काम सुरू आहे. आरोग्य केंद्रात नागरिकांवर प्राथमिक उपचार केले जातात. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र तर खंडहर बनली असूनही ते कागदावर सुरू असल्याचे दाखवले जात आहे. राज्य सरकारच्या मध्यवर्ती रुग्णालयामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत आहेत, इतकेच काय ते समाधान. पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असते. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचारी, डॉक्टर व मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. महापालिकेकडे फक्त तीन डॉक्टर, तीन परिचारिका व इतर कर्मचारी स्थायी स्वरूपाचे असून इतर कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका ठोस वेतनावर घेतले आहेत. आरोग्य, औषधखरेदी व आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी सुविधा पुरवण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाचे आहे. मात्र, विभागाचे बजेट जेमतेम एक ते दीड कोटीचे आहे. एवढ्या कमी बजेटमध्ये शहरातील नऊ लाख लोकसंख्येला कशी आरोग्य सुविधा पुरविणार, हा खरा प्रश्न आहे. पावसाळ्यात आपत्कालीन कक्षाची स्थापना महापालिकेला मध्यवर्ती रुग्णालयात करावी लागते. तसेच इतर सुविधांसाठी मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते, अशी दयनीय अवस्था पालिकेच्या आरोग्य विभागाची झाली आहे.

Web Title: Three years into healthcare, Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.