वागळे इस्टेट भागात रस्ता खचून तीन वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 05:07 PM2019-06-15T17:07:23+5:302019-06-15T17:09:12+5:30

वागळे इस्टेट भागात फुटपाथच्या बाजूचा रस्ता खचून त्यात तीन वाहने तब्बल १५ फुट खाली गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.

Three vehicles lost due to road crash in Wagle Estate area | वागळे इस्टेट भागात रस्ता खचून तीन वाहनांचे नुकसान

वागळे इस्टेट भागात रस्ता खचून तीन वाहनांचे नुकसान

Next
ठळक मुद्देवाहने १५ फुट गेली खालीसुदैवाने जिवीतहानी टळली

ठाणे - स्टेशन परिसरात होर्डीग्ज पडल्याची आणि त्यानंतर नितिन कंपनी येथे सिग्नल पडल्याची घटना ताजी असतांना शुक्रवारी रात्री वागळे इस्टेट परिसरातील रामचंद्र नगर भागात फुटपाथ च्या शेजारी असलेला रस्त्याचाच काही भाग चक्क खचल्याची घटना घडली आहे. या दुर्गघटनेत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन चार चाकी वाहन आणि एक रिक्षा अडकली होती. ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने ही वाहने पहाटे पाच च्या सुमारास बाहेर काढण्यात आली आहेत. सुदैवाने या तिसऱ्या घटनेतही कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
               रामचंद्र नगर क्रमांक ३, कामगार रुग्णालयाच्या नजीक असलेल्या राजमुद्रा सोसायटीच्या समोरील रस्त्याच्या बाजूचा काही भाग शुक्र वारी रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक खचला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सदर दुर्घटनेत याठिकाणी उभ्या असलेल्या दोन चार चाकी गाड्या आणि एक रिक्षा अशी तीनही वाहने थेट १५ फूट खाली गेले. ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. ही माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली टीडीआरफ च्या पथकाने आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने रात्रभर परिश्रम घेऊन जेसीबीच्या साहाय्याने शनिवारी पहाटे पाच वाजता ही तिन्ही वाहने बाहेर काढली. दरम्यान या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील एकच बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली आहे. दरम्यान हा रस्ता खचला कसा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे पडलेले खड्डे योग्य रितीने बुजविण्यात आले नव्हते. येथे जे खोदकाम करण्यात आले होते. ते बुजविण्याच्या कामात योग्य अशी सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्याने ही दुर्घटना घडली असावी असे बोलले जात आहे.




 

Web Title: Three vehicles lost due to road crash in Wagle Estate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.