नशेसाठी कफ सिरपच्या साठयाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक : रिक्षासह सव्वा तीन लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 06:33 PM2019-04-03T18:33:28+5:302019-04-03T18:40:36+5:30

भिवंडी परिसरातून आणलेल्या कफ सिरप या औषधाच्या साठयाची तस्करी करणाऱ्या चाँदबाबू खान याच्यासह तिघांना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून १७३४ बाटल्यांमधून वेगवेगळया कंपनीचा कफ सिरपचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

 Three smugglers cough syrup arrested by Thane Police | नशेसाठी कफ सिरपच्या साठयाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक : रिक्षासह सव्वा तीन लाखांचा माल जप्त

कळवा खारेगाव येथून रिक्षामधून माल हस्तगत

Next
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाईकळवा खारेगाव येथून रिक्षामधून माल हस्तगतकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: नशेसाठी कफ सिरपच्या औषधांची बेकायदेशीरपणे विक्री करणा-या चाँदबाबू खान (२४, घाटकोपर, मुंबई), परवेझ शेख (३३, रा. विक्रोळी) आणि रिक्षा चालक अकबर अली शेख (२०, रा. घाटकोपर, मुंबई) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून रिक्षा आणि वेगवेगळया कंपनीच्या कफ सिरपच्या बॉटल्स असा तीन लाख २१ हजार २८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
कळवा, खारेगाव टोलनाका येथे तिघे जण रिक्षामधून कफ सिरप या औषधाची नशेसाठी लोकांना बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहायक पोली निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वालझडे यांच्यासह उपनिरीक्षक डॉ. धर्मराज बांगर, उपनिरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस नाईक दिलीप सोनवणे, नामदेव मुंढे, राजाराम शेगर, महादेव चाबुकस्वार आणि अनुप राक्षे आदींच्या पथकाने खारेगाव येथे टोलनाक्याहून मुंबईकडे जाणा-या मार्गावर सापळा रचून एका रिक्षाला त्यांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या हालचाली या रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने अकबर अली शेख हा रिक्षा चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना या पथकाने त्यांना पकडले. त्याच्या रिक्षाच्या झडतीमध्ये १२ प्लास्टीकच्या बॅग मिळाल्या. त्यामध्ये कफ सिरपच्या १७३४ वेगवेगळया कंपन्यांच्या बॉटल्स मिळाल्या. या कप सिरप औषधांच्या बॉटल्स नशा करणाºया लोकांना विक्रीसाठी भिवंडी परिसरातून आणल्याची माहिती त्यांनी प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांना दिली. त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा तसेच इतर कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे. तिघांनाही १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title:  Three smugglers cough syrup arrested by Thane Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.