कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू, भिवंडी-वाडा मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:25 AM2018-01-24T02:25:59+5:302018-01-24T02:26:05+5:30

भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

 Three killed in the container, Bhiwandi-Wada road incident | कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू, भिवंडी-वाडा मार्गावरील घटना

कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू, भिवंडी-वाडा मार्गावरील घटना

Next

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.
असद हुसेन मिर्झा (२३), सोेहिद अख्तर अन्सारी (२०), समीर फारु क अन्सारी (२०) अशी तिघांची नावे आहेत. औरंगाबादहून आलेल्या समीर सोबत पार्टी करण्याच्या हेतूने ते तिघे दुचाकीवरून वाडा रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मध्यरात्रीनंतर ते परत येताना बोरपाडा गावाजवळील वळणावर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यापैकी दोघांचा जागेवर मृत्यू झाला. तर तिसºयाला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्याचवेळी म्हापोली गावातून येणाºया शोएब मोमीन याने या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.
दरम्यान, बंगालपुरा येथे राहणारा असद मिर्झा याचा २५ जानेवारी तर गुलजारनगर येथे राहणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारीला विवाह होणार होता.

Web Title:  Three killed in the container, Bhiwandi-Wada road incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात