बंदमुळे उद्योगांचे हजार कोटींचे नुकसान, निर्यातीलाही बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:40 AM2018-01-05T06:40:08+5:302018-01-05T06:40:27+5:30

कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. त्याचा फटका ठाण्यासह जिल्ह्यातील उद्योगांनाही बसला. अनेकांना नव्या वर्षात दिलेल्या तारखेला निर्यात करायची होती.

 Thousands of industry losses, losses in exports, and bus crashes | बंदमुळे उद्योगांचे हजार कोटींचे नुकसान, निर्यातीलाही बसला फटका

बंदमुळे उद्योगांचे हजार कोटींचे नुकसान, निर्यातीलाही बसला फटका

Next

ठाणे - कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. त्याचा फटका ठाण्यासह जिल्ह्यातील उद्योगांनाही बसला. अनेकांना नव्या वर्षात दिलेल्या तारखेला निर्यात करायची होती. ती खोळंबली. जिल्ह्यातील ९० टक्के उद्योग बंद असल्याने सुमारे एक हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसल्याची माहिती उद्योजकांनी दिली.

ठाण्यासह जिल्ह्यातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. त्याचा फटका जसा सार्वजनिक वाहतुकीला बसला तसाच ठाण्यासह अंबरनाथ, नवी मुंबई आदी ठिकाणच्या लहानमोठ्या उद्योगांनादेखील बसला आहे. ठाण्यातील वागळे इंडस्ट्रीज भागातील सुमारे १५० उद्योग बंद होते. तर अंबरनाथ, नवी मुंबईतदेखील हीच परिस्थिती दिसून आली. ठाण्यासह जिल्ह्याच्या इतर भागांत छोटेमोठे असे एकूण तीन हजारांच्या आसपास उद्योगंधदे आहेत. या सर्वांनाच या बंदचा फटका बसल्याची माहिती कोसिया या संघटनेने दिली आहे. सकाळी काही उद्योग सुरू होते. परंतु, त्या ठिकाणी कामगारवर्गच पोहोचू शकला नाही. बस आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने कामगारांना कामावर पोहोचणे शक्य झाले नाही. काही ठिकाणी कामगार पोहोचले असले तरीदेखील अवघ्या काही तासांतच बंदच्या हाकेमुळे उद्योग बंद करावे लागले.
नवी मुंबईतील एका उद्योजकाला बुधवारी जहाजाने आपले
प्रॉडक्ट पाठवायचे होते. परंतु, त्यांचे जहाज चुकले आणि त्यांनायाचा मोठा फटका सहन करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वागळेसह जिल्ह्यातील सुमारे तीन हजार उद्योगांपैकी ९० टक्के उद्योगांना बंदचा फटका बसल्याची माहिती कोसियाने दिली. प्रत्येक छोटा अथवा मोठा उद्योग असो, अशा सर्वांनाच याचा फटका बसला असून सुमारे एक हजाराच्या कोटींवर नुकसान सोसावे लागले आहे. आता ते भरून कसे काढायचे, असा पेच मात्र या उद्योगांपुढे निर्माण झाला आहे.
आधीच वीज-पाण्याची समस्या, खराब रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव, नोटाबंदी आणि जीएसटी अशा वेगवेगळ््या समस्यांत भरडून निघालेल्या उद्योगांचे या आणखी नुकसानीमुळे कंबरडे मोडल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली.

अंबरनाथच्या कारखान्यांचे ७० कोटींचे नुकसान

अंबरनाथ : कोरेगांव-भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी शहरात पाळण्यात आलेल्या बंदमुळे अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने वगळता सर्व कारखाने बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे एका दिवसात तब्बल ७० कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (आमा)चे अध्यक्ष उमेश तायडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

अंबरनाथ बंदमध्ये सहभागी होण्याकरिता शहरातील उद्योग बंद ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी संघटनेकडे केली होती. सर्व यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्था बंद राहणार असल्याने संघटनेने रासायनिक कारखाने वगळता अन्य कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रासायनीक कारखाने लागलीच बंद करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने रासायनिक कारखाने वगळता शहरातील तब्बल ७० टक्के कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कामगारांना कामावर येताना कोणताही त्रास नको म्हणून ही भूमिका घेण्यात आली होती. मात्र एका दिवसात शहरातील कारखानदारांचे सुमारे ७० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज तायडे यांनी व्यक्त केला. अर्थात बंदमध्ये कारखाने सामील झाल्याने आंदोलनकर्त्यांकडून कोणत्याही कारखान्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. अंबरनाथ शहरातील वडवली एमआयडीसी, चिखलोली एमआयडीसी या भागात बहुसंख्य रासायनिक कारखाने असल्याने ते सुरु ठेवण्यात आले होते.

मात्र इतर कारखाने बंद ठेवण्यात आले. आनंदनगर एमआयडीसी भागातील ७० टक्के कारखाने बंद ठेवण्यात आले होते. केवळ रासायनिक कारखाने सुरु होते. मात्र या कारखान्यांत काम करण्यासाठी कामगार न आल्याने अनेक कारखान्यातील कामगारांना डबलड्युटी करावी लागली. अंबरनाथ औद्यागिक पट्टयात रासायनिक कारखान्यांची संख्या ३० टक्के असून उर्वरित ७० टक्के कारखाने हे इतर क्षेत्राशी निगडीत आहेत. एका दिवसाला सरासरी १०० कोटींची उलाढाल अंबरनाथ औद्योगिक पट्ट्यात होते. मात्र रासायनिक कारखाने वगळता अन्य कारखाने बंद राहिल्याने नुकसानाचा आकडा हा ७० कोटींच्या घरात गेला आहे.

व्यापाºयांचे १५० कोटींचे नुकसान

कल्याण : हिंसाचाराची घटना व त्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ यामुळे कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गाचे जवळपास १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कल्याण व्यापारी महामंडळाचे सरचिटणीस विजय पंडित यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात १० हजार व्यापारी आहेत. त्यात दूध विक्रेते, भाजी विक्रेते, अन्नधान्य विक्रेते, किराणा मालाचे विक्रेते, सोन्या-चांदीचे व्यापारी व अन्य विक्रेत्यांचा समावेश आहे.
दोन्ही शहरात दिवसाला जवळपास १५० कोटी रुपयांची उलाढाल होते. कालच्या बंद आंदोलनाचा फटका व्यापारी वर्गाला बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमासही बंद आंदोलनाचा फटका बसला आहे. परिवहन उपक्रमाचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कालच्या बंदमुळे दिवसभरात २५ ते ३० बसगाड्या रस्त्यावर बाहेर पडू शकल्या नाहीत.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले की, बाजार समितीत बुधवारी पहाटेच्या सुमारास १६१ गाड्या आल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीचे नुकसान झालेले नाही. ११ वाजल्यानंतर ज्या पालेभाज्याच्या गाड्या येतात. त्या बंद आंदोलनमुळे बाजार समितीत येऊ शकल्या नाहीत. अशा गाड्यांची संख्या १५ आहे.
त्यामुळे पालेभाज्यांच्या व्यवहाराचे जवळपास २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बंदचा फटका कारखानदारीला बसला का याविषयी ‘कामा’ संघटनेचे अध्यक्ष मुरली अय्यर यांच्याकडे विचारणा केली असता कारखाने सुरु होते. कारखान्यातील काही कामगारच बंदमुळे वेळेवर पोहचू शकले नव्हते. त्यामुळे बंदचा फटका कारखानदारीला बसलेला नाही.

बंदप्रकरणी २६ गुन्हे दाखल,
५५ आंदोलकांना अटक

राज्यव्यापी ‘बंद’च्या दरम्यान ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये एकूण २६ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सुमारे ५५ आंदोलकांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘बंद’च्या दरम्यान खोट्या पोस्ट टाकून अफवा पसरवण्याचा प्रयत्न समाजमाध्यमातून झाला. तसेच या काळात चार अधिकाºयांसह १४ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंददरम्यान जाळपोळ करणे, वाहनांची तोडफोड करणे, धक्काबुक्की करणे, दगडफेक करणे आदी कलमांखाली आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले.
आंदोलकांच्या दगडफेकीत चार अधिकारी तसेच १० कर्मचारी असे १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून या आंदोलनाचा संपूर्ण तपशील गोळा करण्यात येत आहे. सर्वाधिक १४ गुन्हे कल्याण परिमंडळातील कार्यक्षेत्रात, त्यापाठोपाठ वागळे इस्टेट ५, भिवंडी ४ आणि उल्हासनगर तसेच ठाणे परिमंडळात प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल झाले आहेत.
अफवा पसरवणाºया वेगवेगळ्या पोस्ट समाजमाध्यमांवर दिवसभर टाकण्यात येत होत्या. वाहतूक सुरळीत असताना जुने फोटो टाकून दिशाभूल करण्याचेही प्रकार घडले. हिंसाचाराचे जुने फोटो टाकून लोकांना भडकवण्याचा प्रयत्नही काही समाजकंटकांनी केला. याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलच्या युनिटला देण्यात आल्याचे पाण्डेय म्हणाले.

एसटीचे नुकसान गेले २७ लाखांवर

ठाणे : बुधवारी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदमध्ये दिवसभरात ठाणे उपविभागाच्या ३ हजार ६०० एसटीच्या फेºया रद्द झाल्याने महामंडळाचे २७ लाख २३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, मागील दोन दिवसांप्रमाणे गुरुवारीही एसटीला आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केले होते. गुरुवारीही भिवंडीत एसटीची एक बस फोडल्याने नुकसानग्रस्त बसची संख्या १३ वर गेली असून अतिरिक्त ३ लाख ५१ हजारांचा भुर्दंड ठाणे विभागाला सहन करावा लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ठाणे नियंत्रण उपविभागात अंतर्गत ठाणे १-२, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, शहापूर, मुरबाड, वाडा असे एकूण ८ डेपो येतात. येथून दररोज ६६५ बसेस रस्त्यावर उतरतात. या बसमधून प्रतिदिन एक लाख १० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी भारिप बहुजन महासंघाने महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. याचदरम्यान, आंदोलनकर्त्यांकडून एसटी बसला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यावर सकाळी ९ वाजल्यापासून एसटी बस प्रवासासाठी बंद केल्या. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत बंद राहिल्याने १५ हजार किलोमीटर मार्गावर एसटीच्या ३,६०० फेºया रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटी २७ लाख २३ हजारांचे नुकसान झाले आहे. दिवसभरात ठाणे उपविभागाचे अंदाजे ६० ते ६३ लाख इतके उत्पन्न अपेक्षित असताना,

Web Title:  Thousands of industry losses, losses in exports, and bus crashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.