आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा उत्पन्नावर परिणाम नाही; अधिकाऱ्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:05 AM2019-02-02T00:05:07+5:302019-02-02T00:05:25+5:30

दलालांची संख्या घटल्याने शुकशुकाट; नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकारी तैनात

There is no impact on the income of the RTO workers' agitation; Officers' Claims | आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा उत्पन्नावर परिणाम नाही; अधिकाऱ्यांचा दावा

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा उत्पन्नावर परिणाम नाही; अधिकाऱ्यांचा दावा

googlenewsNext

ठाणे : कर्मचाºयांचा आकृतीबंध पूर्ण करावा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने शुक्रवारी राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन केले. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात कर्मचाºयांनी निदर्शने केली. तर, आंदोलनामुळे आरटीओच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही अधिकारी तैनात केल्याचे आरटीओ अधिकाºयांनी सांगितले. मात्र, येथे दिसणारा दलालांचा दररोजचा वावर शुक्रवारच्या आंदोलनामुळे कमी झाल्याने कार्यालयासह आजूबाजूच्या परिसरात शुकशुकाट पाहण्यास मिळाला.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत एकूण चार उपप्रादेशिक कार्यालये आहेत. तेथील वेगवेगळ्या १० विभागांत सुमारे ३०० ते ३५० कर्मचारी आहेत. त्यांनी शुक्रवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठीही निदर्शने केली. मोटार वाहन विभागातील कर्मचाºयांचा कर्मचारी आकृतीबंद व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या अनेक मागण्या प्रशासनस्तरावर अकारण प्रलंबित आहेत. परिवहन विभागातील वर्ग-३ कर्मचाºयांच्या भवितव्यास त्यामुळे मोठा धोका उत्पन्न झाला आहे. त्यात मोटार वाहन विभागातील कर्मचाºयांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणेच रेटण्याचा प्रयत्न शासनाने सुरू केला. त्याच्या विरोधात शुक्र वारी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या वतीने लेखणीबंद आंदोलन केले.

ऑनलाइनमुळे फटका नाही
आरटीओचा बºयापैकी कारभार हा आॅनलाइन सुरू झालेला आहे. या लेखणीबंद आंदोलनामुळे आरटीओच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही.
पण, वाहन हस्तांतरण पेपर आणि परवान्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चार अधिकारी नेमले होते, अशी माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.

चौघांना केले होते तैनात
वाहन हस्तांतरणाची कागदपत्रे आणि परवाना यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोर आणि मर्फी येथील आरटीओ कार्यालयात प्रत्येकी दोनदोन अधिकारी तैनात केले होते.

Web Title: There is no impact on the income of the RTO workers' agitation; Officers' Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.