मातीचा भराव टाकून वरसावे गावकऱ्यांच्या तलावाची चोरी; जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 06:27 PM2019-06-20T18:27:44+5:302019-06-20T18:32:46+5:30

वरसावे गावक-यांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षापासून उपयुक्त ठरत आहे. गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपवण्यासाठी त्यात अवैधरित्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावे   गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उता-यावर देखील आहे.

Theft of the pond of the Versace villagers by throwing the soil filled; Complaint with the collector, police | मातीचा भराव टाकून वरसावे गावकऱ्यांच्या तलावाची चोरी; जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार

जिल्हाप्रशासन व पोलिस यंत्रणा या तलावास नष्ठ करणा-यां विकासकावर काय कार्यवाई करणार

Next
ठळक मुद्देसार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रार देखील काशिमीरा पोलिसात तलावाचा भूखंड हडप करण्याच्या उद्देशानेअवैधरित्या विकासकाकडून मातीचा भराववरसावे गावक-यांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षापासून उपयुक्त

ठाणे : घोडबंदर रोडला लागून असलेल्या वरसावे गावातील सार्वजनिक तलावात अवैधरित्या विकासकाकडून मातीचा भराव करून तलाव नष्ठ करण्यात येत आहे. तलावाचा भूखंड हडप करण्याच्या उद्देशाने तलाव नष्ठ केला जात असल्याचे गावक-यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर सार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रार देखील काशिमीरा पोलिसात दाखल केली. तर श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिका-यांना साकडे घालून या तलावाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करून कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
वरसावे गावक-यांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षापासून उपयुक्त ठरत आहे. गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपवण्यासाठी त्यात अवैधरित्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावे   गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उता-यावर देखील आहे. या सार्वजनिक तलावाचा हक्क वरसावे गावक-यांकडे असतानाही त्यात मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला आहे, असे जेष्ठ नागरिक रविंद्र गायकर या गावक-याने काशिमीरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर श्रमजीवी संघटनेने देखील जिल्हाधिका-यांकडे तक्रार करून वरसावे गावक-यांचा सार्वजनिक तलाव नष्ठ केल्याचे नमुद केले आहेत. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष अशोक सापटे, सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर यांनी जिल्हाधिका-यांना लेखी तक्रार देऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
वरसावे गावामध्ये आदिवासी समाज मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपारिक पध्दतीने येथील आदिवासी समाज या तलावात परंपरेनुसार मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. पिण्याच्या पाण्यासाठी या तलावातील पाण्याचा वापर केला जातो. त्यावर शेतीचे उत्पादन देखील घेतले जात आहे. या तलावावर वरसावे गावक-यांचा हक्क असल्याची नोंद सातबारा उता-यावर देखील आहे. पण तलावाचा हा भूखंड हडप करण्यासाठी विकासकाकडून त्यात अवैध मातीचा भराव करण्यात आला. हा जुना सार्वजनिक तलाव नष्ठ करणा-या विकासकाचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय अवैधरित्या टाकलेला भराव पूर्णपणे काढून हा सार्वजनिक तलाव मोकळा करण्यात यावा, त्याची लांब, रूंदी व खोली वाढवण्यात यावी आदी मागण्यासाठी श्रमजीवीने जिल्हाधिका-यांना साकडे घालून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तर चोरीला गेल्या या तलावाचा शोध घेण्यासाठी पोलिसात लेखी तक्रार केली आहे. यानुसार जिल्हाप्रशासन व पोलिस यंत्रणा या तलावास नष्ठ करणा-यां विकासकावर काय कार्यवाई करणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागून असल्याचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतला सांगितले.
........

Web Title: Theft of the pond of the Versace villagers by throwing the soil filled; Complaint with the collector, police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.