ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:56 PM2018-09-19T15:56:32+5:302018-09-19T15:59:01+5:30

ब्रह्मांड कट्टा ही एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. या व्यासपीठावर नवीन कलाकारांना संधी दिली जाते, त्यांच्या कलेच गुणगान केले जाते.  

Thanhane's cosmic storytelling from childhood cast, | ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ 

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ 

Next
ठळक मुद्दे ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिसकथा सादर करुन बालकलाकारांनी दिली साथ कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने मांडला

ठाणे : एक नवीन प्रयोग वर्षा गंद्रे यांनी ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह सभागृहात सादर केला. स्वलिखीत कथा रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाट्यकलेचा आधार घेणारा कथार्सिस हा अभिनव प्रकार नाशिकच्या नीरज करंदीकर व त्याला दोन टि. व्ही. स्टार बाल कलाकार विहान जोशी व श्रेयस आपटे यांनी आपआपल्या कथा सादर करुन साथ दिली. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या कालाघोडा फेस्टीवलच्या आयोजक कमिटी सदस्या वर्षा कारळे हस्ते दिप प्रज्वलित करुन वर्षा गंद्रे यांनी विनायका गो सिध्द गणेशा ही गणेश वंदना सादर करण्यात आली. भारतात प्राचीन कालापासून कीर्तन हा प्रकार मंदिरात केला जायचा. त्यात नारदीय कीर्तन कथेच्या स्वरुपात सांगितले जात असे तसेच समाज प्रबोधन पर उपदेश कीर्तनकार त्यातून करत असायचे. असेच एक कीर्तन बाल कलाकार विहान अविनाश जोशी यांनी केले. विहान जोशीने एकपात्री स्पर्धांतून खुप बक्षीसे मिळवली आहेत. त्यांने कीर्तनात संत तुकारामाचे अभंग सादर केले. अंत्यंत सुमधुर वाणी व गोड आवाज;  स्पष्ट उच्चार यावर प्रभुत्व असलेल्या विहानने कीर्तन सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.  त्याला तबल्यावर डॉ. अविनाश जोशी तर हारमोनियनवर विद्या जोशी यांनी साथ केली. त्यानंतर नासिक वरुन आलेला कलाकार नीरज करंदीकर यांनी स्वलिखीत कथा अत्यंत उत्कृष्ट अभिनय व आवाजाचे चढउतार करुन सादर केल्या.  कथार्सिस हा मूल ग्रीक शब्द अँरिस्टोरल ह्या विचारवंताने त्याच्या पोएटीकस ह्या पुस्तकात पहिल्यांदा मांडला.  कथार्सिस म्हणजे मनात खोलवर दडून बसलेल्या त्रासदायक भावनांना कथानकांच्या द्वारे मुक्त किंवा व्यक्त करणे.  मराठीतील कथा आणि उर्वरित शब्द इंग्रजी मध्ये लिहून कथार्सिस असे प्रयोगशीलता दर्शवणाऱ्या नावाने हा प्रयोग नीरज करंदीकर व अद्वैत मोरे यांनी सुरु केला आहे असे प्रतिपादन निवेदीका वर्षा गंद्रे यांनी केले. निरज करंदीकर याने सादर केलेल्या गणपतीच्या कथेत एका लहान मुलाची निष्पापता,  त्याच्यावर झालेले संस्कार,  सध्याची महागाई व पर्यावरणाची होणारी ऱ्हास यावरील उपाय याचा सुरेख संगम होता. नीरज यांनी सादर केलेल्या गिल्ट या कथेत सध्याची सामाजिक परिस्थिति व्यथित केली.  वृध्दाॆच्या समस्या मांडल्य. नीरज यांच्या कथा अर्ध पुर्ण व अभिनयातून सादरीकरणात रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.  शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे सुराज्य असावे अशी प्रत्येकाची मनोमनी ईच्छा असते. यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा असे वाटते,  अशी शंभु राजांना वाटणारी भावना बाल कलाकार श्रेयस आपटे यांनी त्याच्या कथेतून व अभिनयातून सादर केली.  त्याच्या कलाविष्कार बघताना स्वराज्याचे सुराज्य प्रेक्षकांच्या मनात उलगडत गेले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गायन वर्षा गंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक महेश जोशी व कलाकारांचे स्वागत स्नेहल जोशी यांनी केले.  प्रमुख पाहुण्या वर्षा कारळे यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व कालाघोडा फेस्टीवला येण्यास आमंत्रित केले. कार्यक्रमाची सांगता गणपती बाप्पाच्या आरतीने करण्यात आली. 

Web Title: Thanhane's cosmic storytelling from childhood cast,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.