गाण्यांच्या सुरांवर थिरकले घुंघरू, ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर बहारदार नृत्यझंकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:36 PM2018-08-21T15:36:22+5:302018-08-21T15:43:08+5:30

ब्रह्मांड कट्टयावर प्रथमच नृत्याचे सादरीकरण करण्यात आले होते. यात मुली आणि महिलांनी उस्त्फुर्त भाग घेतला. 

Thanh Kale Ghunghru, Thane's Universe Cats | गाण्यांच्या सुरांवर थिरकले घुंघरू, ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर बहारदार नृत्यझंकार 

गाण्यांच्या सुरांवर थिरकले घुंघरू, ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर बहारदार नृत्यझंकार 

Next
ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयावर बहारदार नृत्यझंकार गाण्यांच्या सुरांवर थिरकले घुंघरू मुली आणि महिलांनी उस्त्फुर्त घेतला भाग

ठाणे : धुंद गाण्याचे सुर त्यावर थिरकणारे घुंघरू मधुगंधार प्रस्तुत नृत्यझंकार द्वारे ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह सभागृहात प्रथमच नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.  या कार्यक्रमाचे संकल्पना, सूत्रधार व निवेदिका होत्या मधुगंधा इंद्रजीत.  नृत्य ही कला इंद्र नगरीत,  दरबारात थिएटर मध्ये केली जाते.  तीच नृत्यकला ब्रह्मांड कट्टयावर सादर करण्यात आली. 

कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक हँरी फर्नांडिस,  लावणी नृत्यांगना संगीता वडवलकर व आर्ट दिग्दर्शक तुषार गुप्ते यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले तर संस्थापक राजेश जाधव यांना राज्य स्तरीय स्वामी विवेकानंद पुरस्कार मिळाल्याबद्दल ब्रह्मांड कलासंस्कारच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा सत्कार केला. नृत्यझंकार कार्यक्रमाची सुरुवात सायली विसपुते हीने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. अप्रतिम नृत्य सादर करुन पाहुणी कलाकार सायली हीने प्रेक्षकांची मने जिकंली. सायली ही कथ्थक विशारद असून इंजिनियरींगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्यानंतर आली ती रुचिरा मोकल भरतनाट्यमची विद्यार्थीनी,  नालंदा नृत्य निकेतन मधून ती नृत्य शिकली त्याबरोबरच वेस्टर्न नृत्यशैली तिने आत्मसात केली आहे.  त्या दोन्हीचा संगम असलेले नृत्य रुचिराने सादर केले. पण नृत्याची तिची खरी अदा पारंपरिक लावणी यात तर रुचिरा मोकल अग्रेसर तिने एक लावणीचा तोडा व लावणी फ्यूजन सादर करुन रसिकांना शिट्या टाळ्या वाजवायला भाग पाडले. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मै दिवानी हो गयी ह्या सुप्रसिध्द गाण्यावर डॉ. वैजयंती जोशी यांनी हुबेहुब पेहराव व नृत्य सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.  डॉ. वैजयंती जोशी ही प्रथम गृहिणी,  तिच स्वत:च क्लिनिक आहे त्यात योग चिकित्सा,  ताण तणाव व्यवस्थापन,  निसर्ग उपचार इत्यादि उपचार केले जातात.  तिच्या नाट्य नृत्य फैशन शो पेंन्टीग रांगोळी असे अनेक छंद आहेत.  तिचे केस कुरळे मोहक डोळे डौल तिचा न्यारा नृत्याचा तो आगळा तोरा असे वर्णन कवियित्री किरण बर्डे यांनी केले. या वर्णनाप्रमाने तिवे नटरंग सिनेमातील नटरंग उभा शिलेदार जसा ह्या गाण्यावर पक्कड नृत्य सादर केले तर उमरावजान मधील सादर केलेली इन ऑंखों की मस्ती मे नृत्याची झलक पाहून रसिकांची मने तृप्त झाली. 

कट्यार काळजात घुसली या संगीतमय चित्रपटांने सर्व रसिकांची मने जिकंली तसंच समानता गुप्ते हिने सादर केलेल्या अरुणी करुनी या गाणायावर केलेल्या नृत्याने रसिकांच्या मनात ती भरली तिच्या समर्थ अभिनयाने व दिलखेचक नृत्य अदाने रसिकांनी तिला उभे राहून सलाम केला.  समानताने सादर केलेल्या पदमावत या सिनेमातील घुमर घुमर नृत्याने तिने वातावरणात राजस्थानी चित्र उभे केले.  समानता गुप्ते स्वत: नृत्य करतेच पण इतरानांही नृत्य शिकविण्याचे महान कार्य करीत आहे. तिचे वर्णन करताना कवियित्री किरण बर्डे म्हणते चमचमणारी चांदणी,  लखलखणारी माळ,  अंगोपांगी वीज विरहते तिच्या नर्तनातून कला बहरते.  लागा चुनरी में दाग या सुप्रसिध्द गाण्यावर सादर केलेले समानताचे नृत्य अप्रतिम होते.  तिच्या वडील तृषार गुप्ते व आजोबा दिघे काका यांच्या डोळ्यात पाणी आले.  

 

`गोड गोजीरी,  लवलवणारी तनु देखणी, 

तोड्यावरती पदन्यास ती गिरकी चपलख भाऊक वदती

भाव मधुर नयनी बोलती कथ्थकीतून कृष्ण उमलती`

असे जिचे वर्णन करावे अशी चिमुकली सिया काळे झनक झनक पायल बाजे या चित्रपटातील गाण्यावर तिने नृत्य सादर केले तसेच दामिनी मधील तांडव सादर करुन प्रेक्षकांना अचबिंत केले.  राधाकृष्णाची रास क्रिडा तर एकदम सुंदर साद केली.  समानता,  रुचिरा व सिया या तिघीनी ज्वेल थीफ या सिनेमातील होढो पे ऐसी बात या गाण्यावर नृत्य करुन कार्यक्रमांची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हँरी फर्नांडिस व तुषार गुप्ते यांनी आपल्या मनोगतात या नृत्यांगनाचे कौतुक केले तर लावणी नृत्यांगना संगीता वडवलकर यांनी आपल्या दिलकश अदामध्ये येऊ कशी कशी मी नादांयला या गाण्यावर ताल थरला त्याला आवाजाची साथ ब्रह्मांड कट्टयाची गायिका शितल बोपलकर हीने दिली.  नृत्यझंकार हा वेगळ्या प्रतिभेचा कार्यक्रम मधुगंधा इंद्रजीत यांनी सादर केला. एका पेक्षा एक बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाला ब्रह्मांड मंडईचे तुलसीदास मांजरेकर,  रमेश कदम, आनंद खर्डीकर व कवियित्री किरण बर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव तर पाहुण्याचे स्वागत महेश जोशी यांनी केले.

Web Title: Thanh Kale Ghunghru, Thane's Universe Cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.