ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाच्या अकराव्या वर्धापन दिनी "भावगंधर्व" उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:17 PM2019-03-19T16:17:13+5:302019-03-19T16:20:02+5:30

ब्रह्मांड कट्टयाच्या अकराव्या वर्धापन दिनी "भावगंधर्व" उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला. 

Thane's Universe is celebrated on the eleventh anniversary of the Katta, "Bhavgandhavar" in Promoting Response | ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाच्या अकराव्या वर्धापन दिनी "भावगंधर्व" उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाच्या अकराव्या वर्धापन दिनी "भावगंधर्व" उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न

Next
ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयावर कट्टयाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त भावगंधर्वमराठी हिंदी गीतांचा सुरेल नजराणा. रसिक प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ठाणे : ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ* आयोजित ब्रह्मांड कट्टयावर कट्टयाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी स्वरबध्द व संगीतबध्द केलेल्या मराठी हिंदी गीतांचा सुरेल नजराणा.. कनिरा आर्ट प्रस्तुत *भावगंधर्व* या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसिद्ध गायक नितीन श्री,  मधुरा देशपांडे,  वृषाली घाणेकर व पराग पौनीकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केला त्यास रसिक प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. 

     कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत गुरवने उत्तम प्रकारे केले. खरं म्हणजे पंडीत ह्रदयनाथ मंगेशकरांच्या सांगीतिक प्रवासाचे वर्णन दोन अडीच तासात करणे म्हणजे सूर्याला चिमटीत पकडण्या सारखे आहे पण प्रशांतने फार सुंदर शब्दात पंडीतजींचे यथार्थ वर्णन केले.  तर संगीताची साथ किबोर्ड संतोष मोहीते, सुधाकर जाधव, ऑक्टोपॅडवर प्रशांत रागमहाले तर ढोलकी तबल्यावर रितेश पाटील यांनी उत्तम साथ दिली.  यावेळी ब्रह्मांड हीरानंदानी परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या एकवीस सामाजिक संस्थाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व बाबा आमटेची तु बुध्दी दे, तु तेज दे.. ही प्रार्थना ब्रह्मांड कट्टयाच्या गायिका मुक्ता साठे हीने सादर केली. त्यानंतर कनिरा आर्टचे कलाकारांनी हृदयनाथ मंगेशकर यांची एकाहून एक सरस गाणी घेऊन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.  नितिन श्री यांनी या फुलांचा गंध कोषी,  स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तु मला,  मानसीचा चित्रकार तू,  लाजून हसने हे अशी सुरेल गीते गायली.  वृषाली घाणेकर हीने केंव्हा तरी पहाटे,  मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश,  तरुण आहे रात अजूनी राजसा निजलास का रे ही गाणी गाऊन मैफल चिर तरुण ठेवली. कार्यक्रमाची जमेची बाजू ठरली ती मधुरा देशपांडे हीने गायलेली चांदण्यात फिरतांना, जीवलगा दूर घर माझे , बालगू कशाला व्यर्थ कुणाची भिती अशी विविध अंग उलगडणारी गाणी घेऊन कार्यक्रमाची उंची वाढविली. मंगेशकर यांनी स्वरबध्द केलेली कोळी गीत, सुगम संगीत, भावगीते यांची मेलडी घेतांना राजा सारंगा,  मी डोलकर डोलकर दर्याचा राजा, मी रात टाकली, मी कात टाकली, नभ उतरु आलं,  जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी,  लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला... अशी सुरेख गीते सर्व गायक कलाकारांनी आपआपल्या शैलीत साद करुन रसिकांना ताल थरायला भाग पाडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर,  जेष्ठ साहित्यक दाजी पणशीकर,  जेष्ठ पत्रकार मिलिन्द बल्लाळ हे उपस्थितित होते.  प्रमुख पाहुण्याच्यां हस्ते ब्रह्मांड हीरानंदानी येथिल वीस सामाजिक संस्थांचा व ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव हे चालवित असलेल्या ब्रह्मांड आझादनगर बस प्रवासी संघ,  ब्रह्मांड कट्टा,  ब्रह्मांड वाचक कट्टा,  ब्रह्मांड कलासंस्कार,  व ब्रह्मांड संगीत कट्टा या पाच संस्थाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव तर स्वागत महेश जोशी यांनी केले.  कार्यक्रम सांज स्नेह जेष्ठ नागरिक संघ,  आखिल ब्रह्मांड महीला मंडळ,  हीरानंदानी रिक्रेऐशन क्लब, रोडाज ६१ नॉट आउट क्लब, तनिष्क बंगाली असोसिएशन, दि बुध्दीष्ट वेल्फेअर असोसिएशन, मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळ,  ब्रह्मांड अशा विविध संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिति होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगति जाधव,  स्नेहल जोशी,  आशुतोष पाटणकर,  वर्षा गंद्रे,  संगीता खरे,  वैभव शिंदे,  विनय जाधव,  अरुण दळवी, यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Thane's Universe is celebrated on the eleventh anniversary of the Katta, "Bhavgandhavar" in Promoting Response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.