ठाणेकरांना साध्या तिकिटातच गारेगार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 06:50 AM2017-12-02T06:50:47+5:302017-12-02T06:51:27+5:30

जेएनएनयूआरएमच्या २०० बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होत असतानाच आता ठाणेकरांना साध्या बसच्या तिकिटातच गारेगार अर्थात एसी प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

Thanekar's mausoleum travels in simple trips | ठाणेकरांना साध्या तिकिटातच गारेगार प्रवास

ठाणेकरांना साध्या तिकिटातच गारेगार प्रवास

Next


ठाणे : यात इथेनॉइलवर धावणाºया दोन बस डिसेंबरअखेर ताफ्यात दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाच इलेक्ट्रिक बसदेखील जानेवारीत म्हणजेच नव्या वर्षात ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
परिवहन सेवेच्या विस्कटलेल्या गाड्यामुळे ठाणेकरांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे यावर मात करून ठाणेकरांना उत्तम सेवा देण्यासाठी महापालिका १०० इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेणार आहे. पीपीपी तत्त्वावर त्या रस्त्यावर धावणार असल्या तरी कोणताही खर्च न करता उलट पालिकेला महिनाकाठी १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. आता या बससाठी आवश्यक असणारे चार्जिंग स्टेशन आनंदनगर जकातनाक्यावर उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यानुसार, नव्या वर्षात पहिल्या टप्प्यात पाच बस आनंदनगर ते घोडबंदर-गायमुख या मार्गावर धावणार आहेत. यामध्ये युरोपमध्ये ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बस
धावत आहेत, त्यानुसारच ठाण्यातही त्याच पद्धतीचा अवलंब करून ही
सेवा एका कंपनीकडून दिली जाणार आहे. या बसमध्ये मागील बाजूस संबंधित एजन्सी वायफाय स्टेशन अथवा लॅपटॉप आणि प्रिंटर अथवा इतर काहीही उपलब्ध करून देणार आहे.
दरम्यान, पर्यावरणपूरक पद्धतीच्या इथेनॉइलच्या ५० बस घेण्याचा पालिकेचा मानस असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात डिसेंबरअखेर २, त्यानंतर जानेवारीत पाच आणि मार्चपर्यंत उर्वरित बस दाखल होणार आहेत. त्या घोडबंदर ते ठाणे आणि मुलुंड या मार्गावर सोडण्यात येणार आहेत.

अनेक सुविधा देणार

सध्या परिवहनच्या एसी बसेसचे तिकीटदर घोडबंदरपर्यंत ३५ रुपये आहे. साध्या बसचे दर २१ रुपये आहे. शिवाय, खाजगी बस १५ रुपये आणि शेअर रिक्षादेखील २५ ते ३० रुपये आकारतात.

परंतु, इथेनॉइल बसचे तिकीट केवळ २५ रुपये असणार आहे. बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय, मोबाइल चार्जिंग, एलईडी आदींची सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे. याच एलइडीवर जाहिराती करून पालिका त्यातून उत्पन्न घेणार आहे.

Web Title: Thanekar's mausoleum travels in simple trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे