महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:21 PM2019-01-21T22:21:04+5:302019-01-21T22:30:13+5:30

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकविले आहे. स्पर्धेसाठी नव्हे तर स्वत:चे शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामाची गरज असल्याचे डॉ. राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 Thane Rural Superintendent of Police Dr. Shivaji Rathod won bronze medal in the Police Sports Games | महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना कांस्य पदक

महासंचालकांच्या हस्ते झाला गौरव

Next
ठळक मुद्देपाच किलो मीटर चालण्याची स्पर्धावरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पर्धेत मारली बाजीमहासंचालकांच्या हस्ते झाला गौरव

ठाणे: नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेतील चालण्याच्या स्पर्धेत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी कांस्य पदक पटकविले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते त्यांना हे पदक देण्यात आले. आरोग्य हीच संपत्ती असून व्यायामासाठी नियमित वेळ काढला पाहिजे, असा सल्ला त्यांनी पोलिसांना दिला आहे.
या स्पर्धेत राज्यभरातील पोलीस अधीक्षक, उपायुक्त तसेच यावरील दर्जाच्या पोलीस अधिकाºयांनी सहभाग नोंदवला होता. १६ ते १८ जानेवारी २०१९ रोजी या क्रीडा स्पर्धा नागपूर येथे पार पडल्या. यामध्ये १७ जानेवारी रोजी झालेल्या पाच किलो मीटरच्या चालण्याच्या स्पर्धेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी सुवर्णपदक पटकविले. औरंगाबाद रेल्वेचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी रौप्य तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी कांस्य पदक पटकविले. ४९ वर्षीय डॉ. राठोड यांनी अनेक तरुण आयपीएस तसेच पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या नव्या अधिकाºयांनाही मागे टाकल्याने त्यांचे अनेक अधिका-यांनी विशेष अभिनंदन केले. ठाण्यात नियमित कॅडबरी जंक्शन ते वसंत विहार आणि हिनंदानी मेडोज ते येऊर रस्ता असा दहा किलो मीटर पायी चालणे आणि धावण्याचा व्यायाम करीत असल्याचे ते सांगतात. पैठण येथे (२००० मध्ये ) उपअधीक्षक म्हणून असतांना त्यांनी पायी चालण्याच्या व्यायामाची स्वत:ला सवय लावली ती आजही कायम आहे. केवळ एखाद्या स्पर्धेसाठी नव्हे तर स्वत:चे शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आपण टीव्ही, व्हॉटसअ‍ॅप आणि गप्पा मारण्यासाठी जसा वेळ काढतो, तसा तो नियमित व्यायामासाठीही पोलिसांसह सर्वांनीच काढावा, असा आवर्जून सल्लाही डॉ. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिला.

 

Web Title:  Thane Rural Superintendent of Police Dr. Shivaji Rathod won bronze medal in the Police Sports Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.