ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन : प्लास्टिक मुक्ती, अवयवदानाचा संदेश घेऊन 21,700 स्पर्धक धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:42 PM2018-09-02T15:42:05+5:302018-09-02T15:45:44+5:30

प्लास्टिक मुक्ती आणि अवयव दानाचा मोलाचा संदेश घेऊन २९ व्या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये तब्बल २१ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक धावले.

Thane Mayor Varsha Marathon competition results | ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन : प्लास्टिक मुक्ती, अवयवदानाचा संदेश घेऊन 21,700 स्पर्धक धावले

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन : प्लास्टिक मुक्ती, अवयवदानाचा संदेश घेऊन 21,700 स्पर्धक धावले

Next

ठाणे - प्लास्टिक मुक्ती आणि अवयव दानाचा मोलाचा संदेश घेऊन २९ व्या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये तब्बल २१ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक धावले. प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडू यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित २९ वी ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या पुरुष गटात रंजितकुमार पटेल याने 1 तास 07 मिनिटे 41 सेकंदामध्ये 21 कि.मी. अंतर पूर्ण करुन अजिंक्यपद पटकावले तर 15 कि.मी. अंतराच्या महिला गटात मोनिका मोतीराम आथरे हिने 56 मिनिटे 52 सेंकदात स्पर्धेचे अंतर पूर्ण करुन अजिंक्यपद पटकावले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण करण्यात आले. या दोन्ही विजेत्यांना अनुक्रमे रोख रूपये 75 हजार व रूपये 50 हजार तसेच मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देवून गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील इतर दहा विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

दरम्‍यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य स्पर्धेला सकाळी 6.30 वाजता झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रविंद्र फाटक, शिवसेना ठाणे शहरप्रमुख रमेश वैती, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती दीपक वेतकर, आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल :


21 किमी (पुरुष गट)

रंजितकुमार पटेल (प्रथम), दिपक कुंभार (व्दितीय), संतोष कुमार (तृतीय), विनीत मलिक (चतुर्थ), चंद्रकांत मनवाडकर (पाचवा), अनिश थापा मगर (सहावा), गिरीष वाघ (सातवा), सुलेमान अली (आठवा), पटेल जी.बी. (नववा), महेश खामकर (दहावा)

विजेता स्पर्धक : रंजितकुमार पटेल

दीपक कुंभार

 

15 किमी (महिला गट)

मोनिका मोतीराम आथरे, एलआयसी नाशिक (प्रथम), स्वाती गाढ़वे, सेंट्रल रेल्वे, पुणे (व्दितीय), आरती देशमुख, नाशिक(स्टुडण्ट) (तृतीय), शितल बारई, नागपुर (चतुर्थ), नयन किर्दक, पुणे (पाचवी), ऋतुजा सकपाळ, पुणे (सहावी), आरती परशुराम दुधे, नादेंड (सातवी), प्रियांका दशरथ पाईकराव, डोंबीवली (आठवी), प्राची गोडबोले, नागपुर (नववी), अमृता सुरज इक्के, कोल्हापूर कोरुची (दहावी)


पुरुष गट (सर्वसाधारण) - 10 किमी

पिंटू कुमार यादव (प्रथम), हरमन ज्योतसिंग (व्दितीय), अनंता टी. एन (तृतीय), लक्ष्मण बरासुरा (चतुर्थ), रविदास (पाचवा), पराजी गायकवाड (सहावा), राहूलकुमार राजभर (सातवा), अमृतराज चव्हाण (आठवा), किरण माळी (नववा), राहूल देशमुख (दहावा).

18 वर्षाखालील मुले - 10 किमी

प्रकाश नानासाहेब देशमुख, वाशिंद जिल्हा अ‍ॅथलेटिक्स (प्रथम), संजय मारुती झाकणे, आगरी राजा क्रीडा मंडळ, भिवंडी (व्दितीय), किशोर काशीराम जाधव, वाशिंद जिल्हा अ‍ॅथलेटिक्स (तृतीय), रोहिदास विठ्ठल मोरधा, वनवासी कल्याण आश्रम, विक्रमगड  (चतुर्थ), रोहीत दिलीप जाधव, नॅशनल स्पोटर्स कोरुची कोल्हापूर  (पाचवा), आशिष संजय सकपाळ, वाशिंद जिल्हा अ‍ॅथलेटिक्स (सहावा), विष्णू विठ्ठलराव लव्हाळे, सगरोळी सनराईज, सगरोळी (सातवा), सागर अशोक म्हसकर, राजे स्पोटर्स अ‍ॅकेडमी, बदलापूर (आठवा), गोंविद रामआशीष राजभर, अंबरनाथ कला क्रीडा भारती (नववा), विकी फुलचंद राऊत, पुणे अ‍ॅथलेटीक्स क्लब (दहावा)

15 वर्षाखालील मुले - 5 किमी

पुजाराम चंद्र मोर्या, अबंरनाथ क्रीडाभारती (प्रथम), राकेश रोशन यादव, सेंट्रल रेल्वे स्कुल कल्याण (व्दितीय), रोहीत सुधीराम राजभर, अंबरनाथ क्रीडाभारती (तृतीय), संजयप्रसाद अयोध्याराम बिंद, गार्डियन हायस्कूल, कल्याण (चतुर्थ), दिपेश उमाशंकर भारव्दाज, अबंरनाथ क्रीडाभारती (पाचवा), सुफियान पिरपाशा शेख, राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्कूल (सहावा), निखील गजानन गवई, राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्कूल (सातवा), सुमित प्रकाश खिलारी, ऑक्सफर्ड मेडीयम स्कूल (आठवा), अनिल हिरामण बैजन,  सौ.शा.ना.लाहोटी विद्यालय (नववा), आशुतोष लालबहाद्दूर यादव, डि.डि.एम.इंग्लीश स्कूल (दहावा)

15 वर्षाखालील मुली - 5 किमी

परिना खिलारी, ठाणे महानगरपालिका शाळा (प्रथम), साक्षी कृष्णा जाधव, गणेश क्रीडा मंडळ, ठाणे (व्दितीय), काजल बाबू शेख, राजर्षी छत्रपती शाहू, नवी मुंबई (तृतीय), साधना यादव, रेल्वे स्कूल कल्याण (चतुर्थ), साक्षी संजय सरोज, राजर्षी छत्रपती शाहू, नवी मुंबई (पाचवा), साक्षी गणपत जाधव, राजर्षी छत्रपती शाहू, नवी मुंबई (सहावा), वर्षा प्रजापती, जे.एस.डब्लू स्पोटर्स, वाशिंद (सातवा), वृषाली गजानन गवई, राजर्षी छत्रपती शाहू, नवी मुंबई (आठवा), आरती रामलोट यादव, जे.एस.डब्लू स्पोटर्स, वाशिंद (नववा), संजना सुदामा रॉय, जे.एस.डब्लू स्पोटर्स, वाशिंद (दहावा)

12 वर्षाखालील मुले - 3 किमी

आशिष संतोष यादव, अंबरनाथ कला क्रीडा भारती (प्रथम), अमोल कृष्णा भोये, सौ.शां.ना.लाहेटी विद्यालय, भिवंडी (व्दितीय), मोहिन शब्बीर शेख, सौ.शां.ना.लाहेटी विद्यालय, भिवंडी (तृतीय), राजन रुपचंद सिंह, अंबरनाथ कला-क्रीडा भारती (चतुर्थ), कल्पेश सदाशिव गायकर, शारदा विद्यामंदीर प्राथमिक शाळा, भिवंडी (पाचवा), वैभव प्रभाकर मोरे, रा.छ.शा.म.विद्यालय, रबाळे (सहावा), विनय सुधीराम राजभर, अंबरनाथ कला क्रीडा भारती (सातवा), अनुप अरुण यादव, चव्हाण विद्यामंदीर, दिवा (पूर्व) (आठवा), विशाल राजाराम यादव, अंबरनाथ कला क्रीडा भारती (नववा), रोहीत रमेश तन्वर, जिंदल विद्यामंदीर, वाशिंद (दहावा)

12 वर्षाखालील मुली - 3 किमी

गायत्री अजित शिंदे, सेव्हन स्टार स्पोर्ट अ‍ॅकेडमी (प्रथम), संस्कृती कुंदन जाधव, सेव्हन स्टार स्पोर्ट अ‍ॅकेडमी (व्दितीय), सरिता समीर पाटील, जे.एस.डब्लू, वाशिंद (तृतीय), राधा यादव, सेंट्रल रेल्वे स्कूल, कल्याण (चतुर्थ), तन्वी विजय माने, राधाबाई मेघे विद्यालय, ऐरोली (पाचवी), अदिती रविंद्र पोमण, अजिंक्यतारा स्पोर्टस, कल्याण (सहावी), वर्षा जवाहरलाल प्रजापती, राजर्श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाळे (सातवी), साक्षी नितीन पाटील, सेव्हन स्टार स्पोर्ट अ‍ॅकेडमी (आठवी), सवर शिवशंकर आकुसकर, श्रीमती सुलोचना सिंघानिया विद्यालय, ठाणे (नववी), नंदिनी सिताराम कासकर, ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड मास्टर्स, ठाणे (दहावी).

ज्येष्ठ नागरिक गट

नारायण रामनाथ कदमवार (प्रथम),  एकनाथ रघुनाथ पाटील (व्दितीय),  संभाजी धोंडू डेरे (तृतीय),  हरिश्चंद्र रामचंद्र पाटील (चतुर्थ), किसन गणपत आरबूज(पाचवा)                            

ज्येष्ठ नागरिक महिला गट

रतन रमेश सोमा (प्रथम), मीना शिरीष दोशी (व्दितीय), सुनंदा विजय देशपांडे (तृतीय),  निलम केशव कालगावकर (चतुर्थ)

रन फॉर इन्व्हायरमेंट

अनिलप्रसाद बिंद, आर.व्ही.रनर्स (प्रथम), गिरीष शेलार, ठाणे महानगरपालिका (व्दितीय), बाळराजे जाधव, ठाणे महानगरपालिका, शाळा क्रमांक 81 (तृतीय),  प्रथमेश संजीव पाटील, फादर अ‍ॅग्नल कॉलेज (चतुर्थ), अजय रघुनाथ पाटील, रुस्तमजी (पाचवा)

वॉक फॉर इन्व्हायरमेंट

ऋतूजा राजीव पातेरे (प्रथम), स्नेहा हरचंदे (व्दितीय), योगीता गुजर, ठाणे स्मार्ट सिटी लि. (तृतीय), मैथीली आठवले (चतुर्थ), वंदना मेहेर (पाचवा)

सिनेकलावंतांची उपस्थिती

अभिनेत्री शमिष्ठा राऊत, जुई गडकरी, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, फुलपाखरू या मालिकेतील कलाकार त्रिष्णा, चेतन तसेच वन्समोअर या चित्रपटाचे कलावंत धनश्री दळवी, आशुतोष पत्की, सुजाता कांबळे, विनोद पाटील, निलेश खताळ आणि दिग्दर्शक नरेश बिडकर यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा  दिल्या.

 रन फॉर ऑर्गन डोनेशन

अवयदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाने पुढाकार घेतला होता. या रुग्णालयाचे जवळ जवळ 350 डॉक्टर्स यात सहभागी झाले होते. तसेच ज्या कुटुंबियांची व्यक्तीने मरणोत्तर अवयवदान केले आहे असे कुटुंबीय यात सहभागी झाले होते. अवयव मिळाल्यामुळे ज्यांना नवीन जन्म मिळाला आहे असे लाभार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी ज्यूपिटर रुग्णालयाचे डॉ.अजय ठक्कर, अपोलो रुग्णालयाचे डॉ. निलेश कदम उपस्थित होते. तसेच अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी दैनिक सकाळ ने पुढ़ाकार घेतला होता.

रन फॉर एन्व्हायरमेंट

पर्यावरणाचे संवर्धन करा असा संदेश देत पर्यावरणप्रेमीही मोठया संख्येने उत्साहात या ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते.

विशेष सत्कार

81 कि.मी ची जलतरण स्पर्धा पूर्ण करणारे जलतरणपटू शुभम पवार, यश पावशे व त्यांचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांनाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी अ‍ॅथलेटिक निधी सिंग हिचा सत्कार महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

शांतता संदेश

या स्पर्धेमध्ये शांतता संदेश देण्यासाठी सत्संग फाऊंडेशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

वॉक फॉर फन

वॉक फर फन या स्पर्धेत खासदार, आमदार, महापालिका पदाधिकारी व अधिकारी सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते अधिका-यांचा सन्मान

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्‍या पाशर्श्वभ्मीवर स्पधर्धकांना कोणताही त्रास होवू नये यासाठी गेले तीन दिवस संपूण रात्रभर रस्त्‍यावरील खड्डे भरण्‍याचे काम पूण केले त्‍याबाबत पालकमंत्र्याच्या हस्‍ते सर्व अधिका-यांना गौरविण्यात आले.
 

Web Title: Thane Mayor Varsha Marathon competition results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.