ठामपाची प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:02 AM2018-06-21T03:02:44+5:302018-06-21T03:02:44+5:30

ठाणे महापालिकेने आता प्लास्टिक बंदीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निर्धारीत कालावधीनंतरही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तुंचा वापर केल्याचे आढळल्यास संबधीतांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने बुधवारपासून सुरुवात केली.

Thamapachi plastic and thermocol emulsion | ठामपाची प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्ती

ठामपाची प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्ती

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने आता प्लास्टिक बंदीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निर्धारीत कालावधीनंतरही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तुंचा वापर केल्याचे आढळल्यास संबधीतांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने बुधवारपासून सुरुवात केली.
दुकानांच्या गोडाउनमधील वस्तुंची विल्हेवाट लावण्यासाठीही पालिकने पावले उचलली. त्याकरीता एक व्हॉट्सअ‍ॅप नंबर उपलब्ध करून दिला असून त्यावर एक मेसेज करताच महापालिकेची गाडी प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू उचलण्यासाठी हजर होणार आहे.
>व्हॉटस्अ‍ॅप सेवेद्वारे घरपोच संकलन करणार
काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या वतीने प्लास्टीक आणि थर्माकोल बंदी जाहीर केली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेने ३१ मार्च रोजी नोटीस प्रसिद्ध करून ठाणेकरांना व व्यावसायिक, दुकानदारांना प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी एक महिन्याची मुदत देऊन त्यांची विल्हेवाट लावण्याची संधी दिली होती. त्याची मुदत संपल्यानंतर शहरामध्ये मोठयाप्रमाणात प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंची विक्री व वापर होत असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक बंदी लागू केल्यानंतर मोठ्याप्रमाणातील या वस्तूंची विल्हेवाट कुठे लावायची यासंदर्भात व्यावसायिक, दुकानदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे महापालिकेने ८२९१८३५८९३ हा व्हॉट्सअ‍ॅप क्र मांक उपलब्ध करून दिला आहे. या क्र मांकावर प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंची माहिती दिल्यास पालिकेची गाडी येऊन त्याचे संकलन करणार आहे. ही सुविधा मोफत असणार आहे.
>दंडात्मक कारवाई होणार
प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंचा वापर, खरेदी, विक्री किंवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास संबधीतांवर बुधवारपासून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. बंदी मोडल्यास पहिल्यांदा पाच हजार, त्यानंतर १० ते २० हजारांचा दंड आणि तीन वर्षांचा कारावास होणार आहे.
>प्लॉस्टिक वापर टाळण्याचे आवाहन
सर्वप्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकेल, प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणारे ताट, वाट्या, चमचे, भांडी, अन्नपदार्थ पॅकेजिंगची भांडी आदींचा वापर टाळावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: Thamapachi plastic and thermocol emulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.