ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीवर विधानभवनात चर्चा : केडीएमसी सहकार्य करत नसल्याची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:29 AM2017-11-10T11:29:04+5:302017-11-10T11:31:01+5:30

ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून गावठाण हद्दीतील चिंचोळया रस्त्यांमुळे समस्या गंभीर झाली आहे. त्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह मध्य रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याची टिका स्थानिक लोकप्रतिनिधींसह रहिवाश्यांनी केली. त्यासंदर्भात विधानभवनात गुरुवारी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरेंच्या दालनात बैठक झाली.

Thakurli's traffic congestion will be discussed in the Legislative Assembly: KDMC does not cooperate | ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीवर विधानभवनात चर्चा : केडीएमसी सहकार्य करत नसल्याची टिका

ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीवर विधानभवनात चर्चा : केडीएमसी सहकार्य करत नसल्याची टिका

Next
ठळक मुद्दे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरेंच्या दालनात बैठकमध्य रेल्वे प्रशासनाची बघ्याची भूमिका

डोंबिवली: ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून गावठाण हद्दीतील चिंचोळया रस्त्यांमुळे समस्या गंभीर झाली आहे. त्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह मध्य रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याची टिका स्थानिक लोकप्रतिनिधींसह रहिवाश्यांनी केली. त्यासंदर्भात विधानभवनात गुरुवारी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरेंच्या दालनात बैठक झाली.
त्या बैठकीत ठाकुर्लीतील चोळेगाव येथिल कोंडीसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. ठाकरेंचे स्विय सचिव सुशिल शेलार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यास केडीएमसीचे आयुक्त पी.वेलारसू, ठाण्याचे वाहतूक विभाग पोलिस उपायुक्त अमित काळे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबासाहेब आव्हाड, डोंबिवलीचे वाहतूक नियंत्रण पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे, मध्य रेल्वेचे सह पोलिस आयुक्त दिपक शर्मा , माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विनायक पाटील, धनंजत चाळके आदी उपस्थित होते. ठाकुर्लील गावदेवी परिसरातील रस्ता चिंचोळा असल्याने तेथे अवघा १५ फूट रस्ता आहे. दोन्ही दिशांची दोन वाहने एकाच वेळी जावू शकत नसल्याची वस्तूस्थिती गंभीरे यांनी मांडली. त्यावर आगामी काळात लवकरच ठाकुर्ली उड्डाणपूल तयार होणार असून त्यामुळे ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल असा विश्वास आयुक्त वेलारसू यांनी व्यक्त केला. तसेच महिला समितीनजीकच्या पर्यायी रस्त्यांबाबत सातत्याने केडीएमसी प्रशासन, रेल्वे यांना पत्रव्यवहार केला आहे, परंतू तो पर्याय स्विकारणे, त्याची अंमलबजावणी करण्याकडे दोन्ही प्रशासनाला वेळ नाही, ईच्छाशक्ती नाही अशी नाराजी श्रीकर चौधरी यांनी व्यक्त केली. सातत्याने पत्रव्यवहार तरी किती करायचा, त्यावर कोणतेही उत्तर येत नाही ही स्मार्ट सिटीची स्थिती असल्याची टिका त्यांनी केली. त्यावर रेल्वेचे अधिकारी शर्मा यांनी तातडीने रेल्वे पोलिस दलाच्या ठाकुर्लीतील अधिका-यांसमवेत चर्चा करुन काही पर्याय निघतो का? हे बघितले जाईल असे आश्वासन दिले. तसेच स्मार्टसिटी अंतर्गत अनेक योजना असून त्यात ठाकुर्लीतील गावठाणांचे रस्ते रुंद करणे, कोंडी सोडवणे यासह एकंदरीतच शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर देण्यात येत असल्याचे वेलारसू यांनी स्पष्ट केले. त्यास काही अवधी लागेल, पण उपाययोजना निश्चित होतील. उड्डाणपूलाचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असून त्यासाठी सातत्याने केडीएमसीचे अधिकारी, रेल्वे प्रशासन यांच्यात चर्चा सुरु असून पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्टीकरणही वेलारसू यांनी दिले. झपाट्याने नागरिकरण होत असून प्रत्येकाकडे वाहन असल्याने विशिष्ठ वेळांना ती वाहने रस्त्यावर येतात. त्यात अरुंद रस्ते असल्याने समस्या जटील झाल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
चाळकेंनी वाहतूक कोंडीमुळे प्रदुषणात वाढ होते, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. तसेच वाहनांचा अपघात झाल्यास त्यात महिला, विद्यार्थी जखमी होतात. वर्षानूवर्षे रस्ते रुंद करणे, ठाकुर्ली रेल्वे गेट या समस्या जैसे थे असून काहीही हालचाल होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये महापालिकेसंदर्भात तीव्र नाराजी, असंतोष असल्याचे स्पष्ट केले.
माणिकराव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांबाबत वाहतूक विभागाने काय कारवाई केली आहे, पुढे काय कार्यवाही होणार?, तसेच चोळेगाव परिसरातील हनुमान मंदिरानजीक सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करता येते का? असे विविध उपाय सुचवले. त्यानूसार कोंडी सुटते का याकडे लक्ष द्यावे असेही वाहतूक विभाग, महापालिका यांना सूचित केले.
 

Web Title: Thakurli's traffic congestion will be discussed in the Legislative Assembly: KDMC does not cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.