खंडणीखोरांना अटक : दोन गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 07:12 PM2018-02-16T19:12:42+5:302018-02-16T19:19:36+5:30

कल्याण: एका व्यापा-याला आणि एपीएमसी मार्केटमध्ये बाहेरगावाहून भाजीचा माल विक्री करण्यासाठी येणा-या वाहनचालकांना खंडणीसाठी धमकाविण्याचे दोन स्वतंत्र गुन्हे बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या गुन्हयांची उकल करीत तिघा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. सनी सोळंकी आणि आवेश मोमीन अशी अटक दोघा आरोपींची नावे आहेत तर अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Terrorists arrested: Two crimes expose | खंडणीखोरांना अटक : दोन गुन्हे उघडकीस

खंडणी

Next
ठळक मुद्दे गुन्हयात अल्पवयीन आरोपीचाही समावेशबाजारपेठ पोलिसांची कारवाई

कल्याण: एका व्यापा-याला आणि एपीएमसी मार्केटमध्ये बाहेरगावाहून भाजीचा माल विक्री करण्यासाठी येणा-या वाहनचालकांना खंडणीसाठी धमकाविण्याचे दोन स्वतंत्र गुन्हे बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या गुन्हयांची उकल करीत तिघा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. सनी सोळंकी आणि आवेश मोमीन अशी अटक दोघा आरोपींची नावे आहेत तर अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
कल्याणातील लिब्रल दुकानाच्या मालकाला पाच लाख रूपयांच्या खंडणीसाठी दोघांकडून धमकाविले जात होते. यात खंडणीची रककम एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेऊन ये असे सांगण्यात आले तर जर अर्धा तासात पैसे घेऊन नाही आलास तर बघ मी दुकानात येऊन काय करतो ते असे धमकाविले गेले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. एपीएमसी मार्केट परिसरात भाजीचा माल घेऊन येणा-या वाहनचालकांनाही धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळली जात असे अशी तक्रारही तत्पुर्वी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या दोन्ही गुन्हयांचा कसोशिने तपास करून वरीष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र तायडे यांच्या पथकाने तिघांना अटक करण्यात यश मिळविले. खंडणीप्रकरणी वाहनचालकांना धमकाविल्याच्या आरोपाखाली सनी सोळंकी याला तर दुकानचालकाला खंडणीसाठी धमकाविल्याच्या आरोपाखाली आवेश मोमीनला अटक करून आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
Web Title: Terrorists arrested: Two crimes expose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.