शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या रखडल्या; दुरूस्तीसह नवीन अर्ज भरण्याची शिक्षकाना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:42 PM2018-11-15T18:42:08+5:302018-11-15T18:50:58+5:30

ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी गुरूवारी या बदल्यांचा अद्यादेश जारी केला. त्यात ठाणेसह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकाना या आधी आॅनलाइन भरलेल्या अर्जात दुरूस्ती किंवा अर्ज रद्द करून नवीन अर्ज भरण्याची संधी दिली आहे. यात नव्याने पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना देखील आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. प्राप्त होणाऱ्या  माहिती पत्रकात ठिकठिकाणच्या रिक्त जागांची माहिती शिक्षकांना त्वरीत देण्याची सक्ती देखील शिक्षकण विभागावर करण्यात आली आहे. यामुळे त्यांना पसंतीची शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे.

Teacher transfers online; Opportunities for filling up new forms with repairs | शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या रखडल्या; दुरूस्तीसह नवीन अर्ज भरण्याची शिक्षकाना संधी

शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या रखडल्या; दुरूस्तीसह नवीन अर्ज भरण्याची शिक्षकाना संधी

Next
ठळक मुद्देशिक्षकांना ५ डिसेंबरपासून आॅनलाइन फार्म भरता येईलया बदल्या ३१ मे २०१९पर्यंतच्या संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन केल्या जाणार पात्र ठरलेल्या शिक्षकांनी २०१७ -१८ करीता अर्ज दाखल केले

ठाणे : गजावाजा करून मागील वर्षी जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्यांसाठी आॅनलाइन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात आले. मात्र त्यानुसार अजूनही बदल्या झाल्या नाही. रखडलेल्या या बदल्यांमधील अर्जात शिक्षकाना दुरूस्ती करण्याची संधी आहे. अन्यथा तो रद्द करून नवीन अर्ज भरता येईल. यावेळी पात्र ठरणाऱ्या नवीन शिक्षकाना देखील अर्ज करण्याची सक्ती करण्यात आली आहे. याबदल्यांसाठी ५ डिसेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहे.
ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी गुरूवारी या बदल्यांचा अद्यादेश जारी केला. त्यात ठाणेसह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकाना या आधी आॅनलाइन भरलेल्या अर्जात दुरूस्ती किंवा अर्ज रद्द करून नवीन अर्ज भरण्याची संधी दिली आहे. यात नव्याने पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना देखील आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. प्राप्त होणाऱ्या  माहिती पत्रकात ठिकठिकाणच्या रिक्त जागांची माहिती शिक्षकांना त्वरीत देण्याची सक्ती देखील शिक्षकण विभागावर करण्यात आली आहे. यामुळे त्यांना पसंतीची शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षकांच्या आॅनलाइन पध्दतीने बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. यानुसार पात्र ठरलेल्या शिक्षकांनी २०१७ -१८ करीता अर्ज दाखल केले. मात्र त्या बदल्या अद्याप झाल्या नाही. यावेळी पात्र ठरलेल्या व अर्ज केलेल्या शिक्षकांसह नव्याने पात्र ठरणाऱ्या  शिक्षकांच्या बदल्या आता शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी म्हणजे मे २०१९ या कालावधीत होणार आहेत. या बदल्या ३१ मे २०१९पर्यंतच्या संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन केल्या जाणार आहे. त्यासाठी आधी अर्ज भरलेल्या शिक्षकाना त्यांच्या पसंतीनुसार अर्जात बदल करता येईल किंवा तो रद्द करून नवीन अर्ज दाखल करावा लागणार आहे. याशिवाय नव्याने पात्र ठरलेल्या शिक्षकाना देखील आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहे. संबंधीत शिक्षकांना त्याची जाणीव करून दिली जाणार आहे.
बदलीस पात्र असलेल्या व नव्याने पात्र ठरलेल्या शिक्षकाना आगामी शैक्षणिक वर्षात नवीन शाळेवर हजर होता यावे, या दृष्टीने संबंधीत शिक्षकांना ५ डिसेंबरपासून आॅनलाइन फार्म भरता येईल, याशिवाय जुन्या शिक्षकना फार्ममध्ये बदल करता येईल किंना तो रद्द करून नवीन फार्म भरता येणार आहे. याव्दारे २०१८ - १९ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांच्या या बदल्या होणार आहेत. या बदल्यांच्या दृष्टीने शिक्षकाना सर्व रिक्त पदांची माहिती दिली जाईल. याशिवाय बदलीस पात्र ठरणाऱ्या  शिक्षकांची यादी देखील संबंधीत उपलब्ध होईल. जेणे करून शिक्षकाना त्यांचे अर्ज रिक्त पदास अनुसरून भरता येणे शक्य आहे.

Web Title: Teacher transfers online; Opportunities for filling up new forms with repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.