मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:18 PM2019-07-15T18:18:33+5:302019-07-15T19:42:57+5:30

Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood

Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood | मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

googlenewsNext

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा ही धरणे भरली असून, धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तानसा आणि वैतरणा नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.  या 75 गावांमध्ये वैतरणा नदी किनाऱ्यावरील 42 आणि तानसा नदीच्या किनाऱ्यावरील 33 गावांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवासांपासून धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर आहे. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणे भरत आली आहेत. दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तानसा आणि वैतरणा या नद्यांशेजारील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने या धरणांच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच भिवंडी, शहापूर आणि वाडा येथील तहसिलदारांना पत्रे पाठवली आहेत. 

दरम्यान, पुराचा धोका असलेल्या 75 गावांची नावे मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे.

Web Title: Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.