डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर नुकसानभरपाईचा निर्णय तातडीने घ्या- श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 04:38 PM2017-12-13T16:38:29+5:302017-12-13T16:38:58+5:30

डोंबिवली: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट होत असून नुकसानभरपाईचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Take the decision to compensate for deadly Freight Corridor - Shrikant Shinde | डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर नुकसानभरपाईचा निर्णय तातडीने घ्या- श्रीकांत शिंदे

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर नुकसानभरपाईचा निर्णय तातडीने घ्या- श्रीकांत शिंदे

Next

डोंबिवली: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट होत असून नुकसानभरपाईचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध प्रवासी सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले. त्यावेळी खा. डॉ. शिंदे बोलत होते.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या (डीएफसीसी) वतीने प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मध्य रेल्वे या प्रकल्पग्रस्तांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मनात भीतीचे वातावरण असून घराच्या बदल्यात घर देण्याच्या धोरणाला तातडीने मंजुरी देण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी दिली. तसेच, हे धोरण मंजूर होईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश मध्य रेल्वेला देण्याची विनंतीही त्यांनी गोहेन यांना केली.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुंब्रा स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, डोंबिवली स्थानकातील विनामूल्य वायफाय सेवा आणि कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४/५ आणि ६/७ येथील एकूण तीन लिफ्ट्स आणि स्वच्छतागृह यांचे उद्घाटन, तसेच ठाकुर्ली स्थानकातील बुकिंग आॅफिस आणि एस्कलेटर यांचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन आणि खा. डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सर्व रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे सातत्याने करत असून त्यानुसार कल्याण आणि डोंबिवली स्थानकात यापूर्वीच कक्ष सुरू झाले आहेत. बुधवारी मुंब्रा स्थानकातील कक्षाचे उद्घाटन झाले असून कळवा, दिवा, उल्हासनगर आणि अंबरनाथ या स्थानकांमधील वैद्यकीय कक्षही लवकरच सुरू होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट होऊन बुकिंग आॅफिस, स्कायवॉक आणि एस्कलेटरचा वापर यापूर्वीच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. बुधवारी रेल्वेने या सुविधांचे औपचारिक लोकार्पण केले.

पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम जलदगतीने पूर्ण करा
ठाण्याच्या पुढील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याचे काम मुदतीत पूर्ण व्हावी, यासाठी पावले उचलण्याची विनंतीही खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना केली. हे काम पूर्ण झाल्यावर उपनगरी सेवेच्या किमान ५० फे-या वाढवता येणार असून त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असल्यामुळे आपण सातत्याने हे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, ठाकुर्ली टर्मिनस आणि कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मागार्चे काम तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: Take the decision to compensate for deadly Freight Corridor - Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.