नेवाळी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:43 AM2018-06-24T00:43:15+5:302018-06-24T00:43:18+5:30

कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी

Take the crime off of Newwali protesters | नेवाळी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या

नेवाळी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या

Next

कल्याण : कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी व आंदोलकर्त्यांविरोधातील गंभीर गुन्हे सरकारने मागे घेतलेले नाहीत. ते गुन्हा मागे घ्यावेत, अशी मागणी नेवाळी ग्रामस्थ आणि आंदोलकांनी केली आहे.
१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी येथे विमानतळासाठी एक हजार ६०० हेक्टर जागा ताब्यात घेतली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी ही जागा शेतकऱ्यांना अद्याप परत केलेली नाही. आता त्याच जागेवर संरक्षक भिंत नौदलाने बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याविरोधात वर्षभरापूर्वी २२ जून २०१७ ला नेवाळी येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याप्रकरणी शेकडो आंदोलकाविरोधात गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले.
नेवाळी आंदोलनाला एक वर्ष झाल्यानिमित्त शुक्रवारी नेवाळी आंदोलन जागर सभा चिंचवली येथील समाज मंदिरात झाली. याप्रसंगी भाजपा नेते जगन्नाथ पाटील, शिवसेना आमदार सुभाष भोईर, काँग्रसेचे नेते संतोष केणे, जमीन बचाव संघर्ष समितीचे मथूर म्हात्रे, चैनू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ष उलटले तरी सरकारने नेवाळी आंदोलनानंतर हा प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने हा लढा देण्यासाठी चांगल्या वकिलांची फौज निर्माण करावी लागेल. नेवाळी येथील शेतजमीन परत न मिळाल्याने हे आंदोलन झाले. मात्र, सरकारने पुन्हा भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्रासाठी येथील १३ एकर जागा घेण्याचा घाट घातला आहे. त्यालाही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
नेत्यांनी नेवाळी आंदोलकांची फसवणूक केली आहे. जो नेता आपले प्रश्न सोडवित नाही. त्याला मतदान करू नका. त्याला निवडून देऊ नका. आपल्या गावात पक्षाचा झेंडा नको. त्याऐवजी एकीचा झेंडा लावा, अशी विविध मते या सभेतून पुढे आली. आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की, नेवाळीचा प्रश्न सुटला नाही, हे मी मान्य करतो. मात्र त्यासाठी प्रयत्नच झाले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. मी, आमदार गणपत गायकवाड आणि जगन्नाथ पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी पक्ष नाही, तर समाज महत्त्वाचा आहे. समाजाचा प्रश्न सुटणार नसेल तर आमदारकीवर लाथ मारण्याची तयारी आहे. आमदारकी पाच वर्षांकरीता आहे. समाज जीवनभर आहे. मात्र, आपल्याच समाजातील काही लोक आमचे पाय खेचून अन्य समाजातील नेत्यांची मखलाशी करतात, अशी टीका भोईर यांनी केली.
केणे यांनी सांगितले की, नेवाळी आंदोलनाचा दिवस हा काळा दिवस नाही. शेतकरी, समाजाला जागा करणारा जागृत दिन आहे. शेतकºयांवर गोळा चालविणाºया सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Take the crime off of Newwali protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.