भाजपा नगरसेवकांच्या बार-लॉजवर कारवाई करा, प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:47 AM2018-12-18T05:47:35+5:302018-12-18T05:48:10+5:30

प्रताप सरनाईक : अन्यथा उद्योगांना हात लावू देणार नाही

Take action on the bar-lodge of BJP corporators, Pratap Sarnaik | भाजपा नगरसेवकांच्या बार-लॉजवर कारवाई करा, प्रताप सरनाईक

भाजपा नगरसेवकांच्या बार-लॉजवर कारवाई करा, प्रताप सरनाईक

Next

मीरा रोड : घर, गाळे आणि कंपनीधारकांना आधी मोबदला द्या. हजारोंना रोजगार देणारे जुने उद्योग-व्यवसाय मनमानीपणे तोडलेले शिवसेना खपवून घेणार नाही. त्यामुळे आधी शहरातील अनैतिक व्यवसाय चालणारे बार आणि लॉज तोडा, मगच जुन्या उद्योगांना हात लावा, असा इशारा शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना दिला आहे. शहरातील उद्योग उद्ध्वस्त करून भाजपाने मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रचे थडगे बांधलेलेच आहे. परंतु, आता भाजपाने शहराचे ‘मेक इन रेड लाइट एरिया’ करायला घेतल्याची बोचरी टीका करत आयुक्तांना भाजपाशी संबंधितांची बार-लॉजची यादीच दिली.

आ. सरनाईक यांच्या मतदारसंघातील हाटकेश, काशी, महाजनवाडीमधल्या जुन्या औद्योगिक वसाहती, गाळे आदी भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत पालिकेने मनमानीपणे तोडायला घेतल्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. पालिका अधिकाऱ्यांना खडसावल्याच्या घटनेनंतर हाटकेश भागातील कारवाई थांबवण्यात आली. आ. मेहता यांच्या कामगार संघटनेने आ. सरनाईकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कामबंद आंदोलन केले. सोमवारी भार्इंदर पूर्वेच्या एमआय उद्योगातील औद्योगिक गाळे तोडण्याच्या कारवाईलादेखील सेनेने छोट्या उद्योजकांसह विरोध केला.
आ. सरनाईकांसोबत विरोधी पक्षनेते राजू भोईर, नगरसेवक दिनेश नलावडे, नीलम ढवण, शर्मिला गंडोली, अनिता पाटील, स्रेहा पांडे, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, महिला जिल्हा संघटक स्रेहल सावंत, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम, प्रवक्ते शैलेश पांडे आदींसोबत माजी नगरसेवक हंसुकुमार पांडे, राजेंद्र मित्तल, उमर कपूर व अन्य उद्योजकांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेतली. रस्ता रुंदीकरण तसेच विकासाला विरोध नाही. पण, बुलेट ट्रेन आणि समृद्धी प्रकल्पाप्रमाणे उद्योजकांना पालिकेने मोबदला द्यावा. ज्याचे घर वा गाळा जाणार आहे, त्याला आधी घर, गाळा द्यावा. पण, ज्या उद्योगांमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतोय, तो उद्ध्वस्त करण्याआधी पालिकेने शहरात फोफावलेले बार तसेच लॉज आधी तोडावे, अशी मागणी आ. सरनाईकांनी आयुक्तांकडे केली. ही मागणी करतानाच सरनाईकांनी भाजपा नगरसेवक अरविंद शेट्टी, गणेश शेट्टी, मीना यशवंत कांगणे व पदाधिकारी उदय शेट्टी आदींच्या बार व लॉजची यादीच दिली. तरुण पिढीला व्यसन तसेच अनैतिक मार्गाला लावून उद्ध्वस्त करणाºया या बार-लॉजना तोडा, मगच पालिकेने अन्य बांधकामांस हात लावावा, असे आ. सरनाईकांनी आयुक्तांना सुनावले. आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन देतानाच एमआय उद्योग, हाटकेशची पाहणी केली. बेकायदा संप करणाºया कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कापा आणि ज्यांनी हा बेकायदा संप करायला लावला, त्या संघटनेच्या कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणीसुद्धा सरनाईकांनी केली.
यासंदर्भात लॉज तसेच बार तोडण्याबद्दल पोलीस अधीक्षक यांच्याशी आधीच चर्चा झाली आहे. पडताळणी करून कार्यवाही करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मला रिक्षा चालवण्याचा अभिमान आहे
रिक्षा चालवणारे सरनाईक हे बिल्डरांकडून पैसे घेऊन अरबपती झाले का? या आ. मेहतांच्या खोचक टीकेला आज स्वत: सरनाईक यांनी उत्तर दिले. माझी आई शिक्षिका, तर वडील पत्रकार होते. त्यांच्या चांगल्या संस्कारांतून प्रगती केली. रिक्षा चालवायचो, याचा अभिमान आहे, असे सरनाईक म्हणाले.

आपण ब्ल्यू फिल्म-सीडी विकून मोठे झालो नाही.
२० हजारांची लाच घेताना पकडलो गेलो नाही. फेरीवाल्यांकडून हप्ते घेत नाही की, ठेकेदारांकडून टक्के घेत नाही. चोºयामाºया केल्या नाहीत, असे खरमरीत प्रत्युत्तर सरनाईकांनी आ. मेहतांचे नाव न घेता दिले.

Web Title: Take action on the bar-lodge of BJP corporators, Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.