हॅन्ड वॉशच्या मंजुर प्रस्तावाच्या विरोधात स्वाभीमानी संघटनेचे आंदोलन, शिक्षणाधीकाऱ्यांना दिले फिनाईल आणि बाटल्या भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 03:39 PM2019-06-25T15:39:23+5:302019-06-25T15:41:46+5:30

सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या जोरावर दोन वर्षापूर्वी नामंजुर करण्यात आलेला प्रस्ताव आता मंजुर करुन घेतला आहे. आधी यासाठी ३३ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. आता मात्र त्यासाठीच १ कोटी ४० लाखांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या चुकीच्या प्रस्तावाविरोधात स्वाभीमानी संघटनेने आंदोलन केले.

Swabhimani Sanghatna's agitation against Financier's offer of hand wash; Finale and bottles gift given to the educationists | हॅन्ड वॉशच्या मंजुर प्रस्तावाच्या विरोधात स्वाभीमानी संघटनेचे आंदोलन, शिक्षणाधीकाऱ्यांना दिले फिनाईल आणि बाटल्या भेट

हॅन्ड वॉशच्या मंजुर प्रस्तावाच्या विरोधात स्वाभीमानी संघटनेचे आंदोलन, शिक्षणाधीकाऱ्यांना दिले फिनाईल आणि बाटल्या भेट

Next
ठळक मुद्देन्यायालयात जाण्याचा दिला इशाराशाळेच्या स्वच्छतेकडे आधी लक्ष द्या

ठाणे - सत्ताधाऱ्यांनी जबरदस्तीने हर्बल हॅन्ड वॉशचा महागडा प्रस्ताव मंजुर केला असला तरी याच्या विरोधात आजही आवज उठत आहे. मंगळवारी स्वाभीमानी संघटनेच्या वतीने या मंजुर करण्यात आलेल्या चुकीच्या प्रस्तावाविरोधात शिक्षण मंडळाच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शौचालयांच्या स्वच्छतेसाठी फिनाईलच्या आणि पाण्याच्या बाटल्या तसेच कडी कोयंडे भेट देण्यात आले. हा प्रस्ताव जर रद्द केला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
                         ठाणे नमहापालिकांच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या स्वच्छतेकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये हॅन्ड वॉश बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र हा प्रस्तावच आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून स्वाभिमानी संघटेनेचे ठाणे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नौपाडा येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. काही पालिका शाळांचीच परिस्थिती वाईट असून शौचालयांची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. अनेक शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही. दरवाज्यांच्या कड्या तुटलेल्या आहेत, शौचालयांची स्वच्छता देखील होत नसून जर या मूलभूत सुविधाच मुलांना मिळत नसतील हा तर १ कोटी रु पये खर्च करून हॅन्ड वॉश खरेदी करण्याची आवश्यकताच काय असा सवाल त्रिपाठी यांनी उपस्थित केला आहे. हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या बाहेर यावेळी निदर्शने देखील करण्यात आली.
     ठाणे महापालिकेच्या शाळांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, शाळांच्या इमारती दुरु स्त करण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांना देण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या गैरकारभाराच्या विरोधात आमदार नितेश राणे यांची देखील भेट घेणार असून शिक्षण मंत्र्याच्या माध्यमातून एखादी समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांच्याशी संपर्क साधला असताना या संपूर्ण प्रस्तावाची माहिती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Web Title: Swabhimani Sanghatna's agitation against Financier's offer of hand wash; Finale and bottles gift given to the educationists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.