ठाण्यातील १.८५ लाख शेतकऱ्यांचा सर्व्हे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 05:39 AM2019-02-19T05:39:13+5:302019-02-19T05:39:29+5:30

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : ४७ हजार शेतकºयांचे सर्वेक्षण बाकी

Survey of 1.85 lakh farmers in Thane completed | ठाण्यातील १.८५ लाख शेतकऱ्यांचा सर्व्हे पूर्ण

ठाण्यातील १.८५ लाख शेतकऱ्यांचा सर्व्हे पूर्ण

Next

ठाणे : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकºयांना दरवर्षी सहा हजारांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ७३५ गावांतील एक लाख ८५ हजार शेतकºयांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला असून उर्वरित शेतकºयांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. उर्वरित ४७ हजार शेतकºयांचा सर्व्हेसुद्धा वेळेत पूर्ण करण्याचा दावाही करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. शेतकºयांना थोडा दिलासा मिळावा, म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आदेश ४ फेब्रुवारी २०१९ रोजी काढला. त्यानुसार, आता ठाणे जिल्ह्यातील दोन हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबीयांना दरवर्षी सहा हजार रु पयांची मदत दिली जाणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकºयांचा सर्व्हे करण्याचे काम प्रामुख्याने करण्यात येत आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि सोसायटींचे सचिव हे शेतकºयांची माहिती गोळा करण्याचे काम करत आहेत. ज्या कुटुंबांत पतीपत्नी आणि १८ वर्षांच्या आतील मुले आहेत, अशा कुटुंबीयांना हा लाभ होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकºयांची संख्या अधिक आहे. मात्र, यासाठी या शेतकºयांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. जे शेतकरी नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करतील, अशा शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ९५४ गावांमध्ये दोन लाख ३२ हजार शेतकरी खातेदार आहेत. या शेतकºयांच्या सर्व्हेचे काम जिल्ह्यात सुरू आहे. त्यात आतापर्यंत जिल्ह्यातील ७३५ गावांतील एक लाख ८५ हजार शेतकºयांची माहिती गोळा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकºयांची माहिती वेळेच्या आधी गोळा करून ती पोर्टलवर भरण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.

२६ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार अंतिम यादी
च्योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी मोबाइल क्र मांक, बँकखाते क्र मांक, आधार क्र मांक, स्वयंघोषणापत्र भरून तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहायक यांच्याकडे जमा करावेत. १० फेब्रुवारीपर्यंत शेतकºयांची यादी तयार करुन तपासली जाईल.

च्१२ फेबुवारीपर्यंत कुटुंबनिहाय वर्गीकरण, १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान शेतकरी कुटुंबांची यादी प्रसिद्ध करणे, २१ पर्यंत दुरुस्तीसह यादी तहसीलदारांकडे अंतिम करण्यात येणार असून २६ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल.

Web Title: Survey of 1.85 lakh farmers in Thane completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.