विद्यार्थ्यांना करून देणार ठाण्याची ओळख, टीएमटीतून शहरात फिरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:48 AM2019-06-26T01:48:21+5:302019-06-26T01:48:32+5:30

परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देणे आदी विविध योजना महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

Students will be introduced by the students, TMT will move in cities | विद्यार्थ्यांना करून देणार ठाण्याची ओळख, टीएमटीतून शहरात फिरवणार

विद्यार्थ्यांना करून देणार ठाण्याची ओळख, टीएमटीतून शहरात फिरवणार

Next

ठाणे  - शाळांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी नवनवीन योजना राबविणे तसेच सर्व शाळांमध्ये समानता, भौतिक सुविधा उपलब्ध करणे, शैक्षणिक सहकार्य सेतू, दीपस्तंभ तसेच परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देणे आदी विविध योजना महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.
ठाणे महापालिका शिक्षण विभागाने मनपा, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्य प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी २४ जूनला सहविचार सभा गडकरी रंगायतन येथे आयोजिली होती. यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, यशदा संस्थेचे कार्यक्रम अधिकारी शाम मकरंदपुरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संतोष कदम तसेच शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
गणित, इंग्रजी याविषयांबाबत शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. जग बदलण्याची क्षमता शिक्षणात असल्याचे मत रेपाळे यांनी व्यक्त केले, शैक्षणिक धोरणाच्या बदलाप्रमाणे बदलता आले पाहिजे. तसेच विद्यार्थी सुरक्षिततेबाबत मुख्याध्यापकांनी दक्ष असणे आवश्यक असल्याचे मत शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी व्यक्त केले. गणित सर्व मुले शिकतात, असे सांगून शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मकरंदपुरे यांनी व्यक्त केले.

शालेय जीवनापासूनच हवेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
शालेय व्यवस्थापन, शिक्षण कार्यप्रणाली, नवनवीन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण, स्वच्छता नियोजन, वातावरण निर्मिती, अध्ययन, अध्यापना वातावरण निर्मिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे हे शालेय जीवनापासूनच देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी शिष्यवृत्ती सारख्या परीक्षांसाठी त्यांना प्रोत्साहित करून परीक्षांबाबत त्यांना मार्गदर्शन करणे आदी विविध मते या सभेत मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.

Web Title: Students will be introduced by the students, TMT will move in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.